मुंबई 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादीचा हात; 'या' नेत्याच्या आरोपाने राजकारण तापलं
मुंबई: मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता. त्या हल्ल्याच्या आठवणी अजूनही आठवल्या अंगावर शहरे येतात. दरम्यान भाजपचे नेते आणि माजी प्रवक्ते माधव भंडारी यांनी या हल्ल्याबाबत एक खळबळजनक विधान केले आहे. मुंबईत झालेल्या 26/11 च्या हल्ल्यात कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचा हात होता, असे वक्तव्य माधव भंडारी यांनी केले आहे.
मुंबईत 26/11 च्या हल्ल्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचा हात होता. स्थानिक प्रशासनावर प्रभाव असलेल्या व्यक्तीच्या प्रभावाशिवाय इतका मोठा हल्ला घडू शकत नाही. भाजपचे नेते आणि माजी प्रवक्ते माधव भंडारी पुण्यातील एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणात निर्दोष सुटलेले विक्रम भावे यांच्या पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमात माधव भंडारी बोलत होते. मुंबईवर हल्ला होणार याची सर्वांना कल्पना होती. स्थानिक प्रशासनावर प्रभाव असलेल्या व्यक्तीच्या प्रभावाशिवाय इतका मोठा हल्ला घडू शकत नाही. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश, एम. एम कलबुरगी यांच्या हत्याकांडाद्वारे हिंदुत्ववादी संघटना मोडीत काढण्याचे षडयंत्र रचण्यात आले होते, असे माधव भंडारी म्हणाले आहेत.
ब्राह्मण समाजाला आरक्षणाची गरज नाही
भाजपचे माजी प्रवक्ते माधव भंडारी यांनी ब्राह्मण समाजाबद्दल एक मोठे विधान केले आहे. ब्राह्मण समाजासंदर्भात त्यांनी आरक्षणाविषयी भाष्य केले आहे. माधव भंडारी ही भाजपचे माजी प्रवक्ते आहेत. ब्राह्मण समाजाने कोणताही न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही. स्वतंत्र भारताच्या जडणघडणीत ब्राह्मण समाजाचा वाट दुर्लक्ष करण्यासारखा नाहीये. देशातील उद्योगांच्या उभारणीत ब्राह्मण समाजाचे योगदान फार मोठे आहे, असे भाजपचे माजी प्रवक्ते माधव भंडारी म्हणाले आहेत. माधव भंडारी कल्याणमधील आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
“राजकरणामध्ये संख्येचा आणि पैशांचा टक्का पाहिला जातो. जोपर्यंत आपला टक्का वाढणार नाही तोवर आपल्याला अपेक्षित असे यश मिळणार नाही. आता आपण साडे दहा – अकरा टक्क्यांमध्ये आहोत. हा आकडा काही कमी नाही. गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या समजाचा अपमान करण्याची मोहीम एका विशिष्ठ वर्गाकडून सुरू आहे. ते पाहिल्यानंतर आता गप्प राहून चालणार नाही असे वाटत आहे.”
माजी प्रवक्ते माधव भंडारी म्हणाले, “राजकरणामध्ये संख्येचा आणि पैशांचा टक्का पाहिला जातो. जोपर्यंत आपला टक्का वाढणार नाही तोवर आपल्याला अपेक्षित असे यश मिळणार नाही. आता आपण साडे दहा – अकरा टक्क्यांमध्ये आहोत. हा आकडा काही कमी नाही. गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या समजाचा अपमान करण्याची मोहीम एका विशिष्ठ वर्गाकडून सुरू आहे. ते पाहिल्यानंतर आता गप्प राहून चालणार नाही असे वाटत आहे.”