Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पश्चिम महाराष्ट्रात भाजप कागलचा वचपा काढणार; विनोद तावडे ‘या’ बड्या नेत्याच्या भेटीला, पवारांचे टेन्शन वाढणार?

राज्यात दिवाळीआधी किंवा दिवाळीनंतर विधानसभा निवडणूक होणार आहे. सद्य परिस्थिती पाहता नक्की कोणाला यश मिळणार हे सांगता येणे कठीण आहे. निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी जोरदार तयारी करत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 28, 2024 | 09:29 PM
पश्चिम महाराष्ट्रात भाजप कागलचा वचपा काढणार; विनोद तावडे 'या' बड्या नेत्याच्या भेटीला, पवारांचे टेन्शन वाढणार?

पश्चिम महाराष्ट्रात भाजप कागलचा वचपा काढणार; विनोद तावडे 'या' बड्या नेत्याच्या भेटीला, पवारांचे टेन्शन वाढणार?

Follow Us
Close
Follow Us:

राज्यात दिवाळीआधी किंवा दिवाळीनंतर विधानसभा निवडणूक होणार आहे. सद्य परिस्थिती पाहता नक्की कोणाला यश मिळणार हे सांगता येणे कठीण आहे. निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी जोरदार तयारी करत आहे. राज्यात आपली सत्ता यावी यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी जोरदार तयारी करताना पाहायला मिळत आहे. दरम्यान मविआ आणि महायुतीतील सहभागी पक्ष देखील स्वतंत्रपणे किती जागा जिंकू शकतो किंवा कोणाला सत्ता मिळू शकते याचा अंतर्गत सर्व्हे करताना पाहायला मिळत आहे. दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याची भेट घेतली आहे.

कागलची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार असल्याचे जवळपास स्पष्ट होताच भाजपच्या समरजीत घाटगे यांनी भाजपला सोडचिट्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवारांनी भाजपचा बडा नेता आपल्याकडे वळवल्यानंतर भाजपने देखील त्याच प्रकारची केल्ली सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. कारण भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी सांगलीत जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची भेट घेतली आहे.

विनोद तावडे यांनी माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या शिराळ्यातील घरी जाऊन भेट घेतली आहे. या भेटीत राजकीय खलबतं झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे भाजप कागलचा वचपा काढणार का? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. काही वर्षांपूर्वी माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी भाजपला सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला होता.

आज सांगली जिल्ह्यातील शिराळा इथे आयोजित पदाधिकारी मेळाव्यात पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला.

लवकरच होणाऱ्या विधानसभा निवडणुका व इतर स्थानिक विषयांवर यावेळी चर्चा केली. उत्साहपूर्ण वातावरणात घडलेला हा संवाद राज्यातील राजकारणाची दिशा सांगून गेला!! pic.twitter.com/btjGl9YCh1

— Vinod Tawde (@TawdeVinod) August 28, 2024

दरम्यान, महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी शिवाजीराव नाईक यांची भेट घेतल्याने सांगलीत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिवाजीराव नाईक हे भाजपच्या वाटेवर तर नाहीत ना? अशी चर्चा होत आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या घडामोडी घडत आहेत. समरजित घाटगे हे शरद पवार गटात जाणार आहे. तर इंदापूरचे जागा देखील अजित पवार यांच्याकडे गेल्यास हर्षवर्धन पाटील देखील काही वेगळा मार्ग निवडणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Bjp leader vinod tawde meet ex minister shivajirao naik in sangli tension has increase to sharad pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2024 | 09:29 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly Elction 2024
  • sharad pawar news

संबंधित बातम्या

Amol Mitkari News: पांडुरंगाची इच्छा असेल तर आषाढी एकादशीपर्यंत…; अमोल मिटकरींचे सूचक विधान
1

Amol Mitkari News: पांडुरंगाची इच्छा असेल तर आषाढी एकादशीपर्यंत…; अमोल मिटकरींचे सूचक विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.