कल्याण : ज्याना गद्दारी करून कमी वेळात अमाप पैसा आणि सत्तेत बळ मिळाले आहे. त्यांना त्यांच्या नजरेने सर्वजण विदूषक आहेत .असा भास होतो, असे प्रत्युत्तर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी नाव न घेता खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना दिले आहे. आता कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट भाजपमध्ये सुरू असलेला वाद आणखी आणखी पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
चार राज्यांच्या निकालानंतर कल्याणमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वात त्यांच्या कार्यकर्त्यांनी कार्यालया बाहेर जल्लोष साजरा केला. यादरम्यान भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितले येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत कल्याण आणि भिवंडी या दोन्ही ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून येणार, म्हणजे त्यांनी एका प्रकारे शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांना लक्ष्य केले होते. यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या पाहणी दौरादरम्यान जेव्हा त्यांना या संदर्भात प्रश्न विचारला गेला त्यांनी सांगितले की गणपत गायकवाड यांचे विधान मनोरंजना पुरते आहे प्रसिद्धीसाठी आहे मी टिकेला उत्तर देत नाही काम करतो काही लोकांना आपले व्यक्तव्य रिव्हर्स घ्यावे लागले होते. अशी प्रतिक्रिया दिली होती
श्रीकांत शिंदेच्या या प्रत्युत्तरानंतर परत भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी एक ट्विट केला आहे. ज्यामध्ये त्यांनी नाव न घेता खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर सडेतोड टीका केली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात गेल्या काही महिन्यांपासून हा वाद सुरू आहे. डोंबिवलीत मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये भाजपा पदाधिकारी नंदू जोशी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये वाद सुरू झाला. हा वाद आता मिटल्याचे वरिष्ठ नेत्यांकडून सांगितले गेले होते. परंतु भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या घरी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली आणि या भेटीदरम्यान भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली होती. कसा प्रकारे त्यांना प्रशासन आणि पोलिसांकडून दुजाभाव दिला जात आहे आणि याच्या मागे शिवसेना आहे असे सांगितले होते. हा वाद सुरू असताना आता भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी ट्विट करीत श्रीकांत शिंदे यांच्यावर हल्लाबोल केल्याने आता हा वाद अजून पेटणार आहे अशी याची शक्यता वर्तवली जात आहे