Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशात आयुर्वेद गुरुकुलम् महाविद्यालय होणार, केंद्रीय राज्यमंत्री जाधव यांची घोषणा; आरोग्यसेवा सक्षम होईल

Ayurveda Gurukulam Colleges in india Prataprao Jadhav : बुलढाण्यात आयुर्वेद शिक्षण, संशोधन आणि औषधांच्या गुणवत्तापूर्ण परीक्षणाला चालना देण्यासाठी देशात ‘आयुर्वेद गुरुकुलम्’ महाविद्यालये सुरू करण्याची घोषणा केंद्रीय आयुष तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 18, 2026 | 09:07 PM
Ayurveda Gurukulam Colleges

Ayurveda Gurukulam Colleges

Follow Us
Follow Us:
  • आयुर्वेद शिक्षणाला मिळणार नवी दिशा
  • देशभरात ‘आयुर्वेद गुरुकुलम्’ महाविद्यालये सुरू होणार
  • प्रतापराव जाधवांची मोठी घोषणा
बुलढाणा: आयुर्वेद शिक्षण, संशोधन आणि औषधांच्या गुणवत्तापूर्ण परीक्षणाला चालना देण्यासाठी देशात आयुष मंत्रालयाच्या वतीने आयुर्वेद गुरुकुलम् महाविद्यालये सुरू करण्यात येणार असून, केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान अनुसंधान परिषदेच्या आठ परिघीय संस्थांमध्ये औषध परीक्षण प्रयोगशाळा (डीटीएल) सुविधा विकसित करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय आयूष तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)  प्रतापराव जाधव यांनी गुरुवारी बुलढाणा येथे केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘शाश्वत विकासाची अविरत २५ वर्षे सेवासंकल्प अभियान’ अंतर्गत जिल्हा स्त्री रुग्णालय येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आ. संजय गायकवाड, नगराध्यक्ष पूजा गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे, जि. प.चे सीईओ गुलाब खरात, राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कैलास झिने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रेय बिराजदार, जिल्हा आरोग्य अधिकारी रणजित मंडाले, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रशांत पाटील आदी उपस्थित होते. केंद्रीय राज्यमंत्री जाधव म्हणाले, नागरिकांचे आरोग्य निरोगी व सक्षम राहण्यासाठी आधुनिक वैद्यकीय उपचारांसोबत आयुर्वेद, योग आणि पारंपरिक उपचार पद्धतींचा समन्वय साधून

एकात्मिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यावर केंद्र व राज्य शासनाचा भर आहे. विविध आजारांचे वेळीच निदान झाल्यास उपचार अधिक परिणामकारक ठरतात. त्यामुळे प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला विशेष महत्त्व देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. आयुर्वेद व योगाला जागतिक स्तरावर मान्यता मिळत असून, अनेक देशांकडून या उपचार पद्धर्तीबाबत माहिती व प्रशिक्षणाची मागणी होत आहे. आयुर्वेद, योग आणि आधुनिक वैद्यकीय उपचारांचा समन्वय झाल्यास नागरिकांना अधिक व्यापक आरोग्य सुविधा उपलब्ध होऊ शकतात. याच उद्देशाने देशभरात आयुष्मान आरोग्य मंदिरे तसेच आयुष विभागाच्या विविध सेवा कार्यान्वित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या धर्तीवर देशाच्या विविध भागात आयुर्वेद शिक्षण व संशोधनाच्या सुविधा निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आयुर्वेद व योगाचा प्रसार देशाच्च्या सीमांपलीकडे होत असून, २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन आणि २३ सप्टेंबर हा आयुर्वेद दिन म्हणून साजरा केला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. बुलढाणा येथील राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांना अधिक सक्षम आरोग्य सुविधा उपलब्ध होत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून भविष्यात राज्याच्या आरोग्य व्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. आ. संजय गायकवाड यांनी बुलढाणा येथे उपलब्ध होत असलेल्या वैद्यकीय व शैक्षणिक सुविधांची माहिती दिली.

राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामुळे दरवर्षी १०० विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची संधी मिळत आहे. कृषी महाविद्यालयात ६० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय असून, बी.एससी. नर्सिंग व आधुनिक पदवी अभ्यासक्रमांमुळे आरोग्य शिक्षण क्षेत्राला गती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, योग व निसर्गोपचार पद्धतींचा एकत्रित लाभ नागरिकांना मिळावा यासाठी आयुर्वेद महाविद्यालयाच्या अनुषंगाने पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्ह्यात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने बायपास सर्जरी, अँजिओप्लास्टी, क्रिटिकल केअर व न्यूरोसर्जरीसह विविध सुविधा विकसित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

५० खाटांच्या आयूष रुग्णालयाचे भूमिपूजन

सेवासंकल्प अभियानांतर्गत जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात ५० खाटांच्या सुसज्ज आयूष रुग्णालयाचे भूमिपूजन केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या रुग्णालयामुळे जिल्ह्यातील गोरगरीब व गरजू नागरिकांना आयूष उपचार पद्धतीच्या माध्यमातून आरोग्यसेवेचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

आयुर्वेद गुरुकुलम् महाविद्यालय

प्रतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून देशभर आयुष मंत्रालयाच्यावतीने आयुर्वेद गुरुकुलम् महाविद्यालय सुरू करणार आहे. आयुर्वेद गुरुकुलम् ही निवासी आयुर्वेद संस्था असून, येथे दोन वर्षांचा प्री-आयुवेदा कार्यक्रमासह साडेसात वर्षांचा बीएएमएस पदवी अभ्यासक्रम राबविला जाईल, अध्यापनाचे माध्यम संस्कृत असेल.

Buldhana News: ९५ दाम्पत्यांचे अनुदान रखडले; गतवर्षी ३०, यंदा ६५ अर्ज रखडले; आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना

Web Title: Buldhana ayurveda gurukulam colleges prataprao jadhav

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 09:07 PM

Topics:  

  • Buldhana
  • College
  • Prataprao Jadhav

संबंधित बातम्या

Buldhana News: ९५ दाम्पत्यांचे अनुदान रखडले; गतवर्षी ३०, यंदा ६५ अर्ज रखडले; आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना
1

Buldhana News: ९५ दाम्पत्यांचे अनुदान रखडले; गतवर्षी ३०, यंदा ६५ अर्ज रखडले; आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना

टग ऑफ वॉरमध्ये बुलढाण्याचा डंका; राज्यस्तरीय स्पर्धेत १५ आणि १७ वर्षांच्या गटात दोन गोल्ड मेडल
2

टग ऑफ वॉरमध्ये बुलढाण्याचा डंका; राज्यस्तरीय स्पर्धेत १५ आणि १७ वर्षांच्या गटात दोन गोल्ड मेडल

दुष्काळसदृश यादीत बुलढाण्याचा समावेश करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची विनंती
3

दुष्काळसदृश यादीत बुलढाण्याचा समावेश करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची विनंती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.