Karanja Bike Theft Case
शिवकुमार जगताप (२३), आकाश कचरे (२५), मोहनराज पेटेवार (२८) आणि ऋषीकेश काळे (२६) असे आरोपींचे नावे आहे. मिळालेल्या माहितीनुसार २४ ऑगस्टला लखन सुनील टाले (१९, रा. शेलुवाडा, ता. कारंजा) हे मित्र हरीओम पंजाब म्हस्के याच्यासोबत कारंजाकडे येत होते. कीर्ती गोल्ड सोयाबीन कंपनीसमोर कार त्यांच्या समोर थांबली. कारमधील आरोपींनी लखन यांना बाटली व प्लास्टिक पाइपने मारहाण केली.
त्यानंतर त्यांच्या खिशातील मोबाइल आणि एमएच ३७ एएल ७८९७क्रमांकाची दुचाकी जबरीने घेऊन पसार झाले. याप्रकरणी कारंजा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी ५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून चोरीचा मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, अपर पोलिस अधीक्षक लता फड व उपविभागीय पोलिस अधिकारी मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल बोरकर करीत आहे. तसेच आरोपीवर गुन्हा दाखल केला.






