Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sushil Kedia: ‘मी मराठी शिकणार नाही…”, मनसे स्टाईल दणका, उद्योजक सुशील केडियांचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं

तुम्हाला काय करायचंय बोला असं आव्हाने देणारे उद्योजक सुशील केडियांचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं आहे. मनसे कार्यकर्त्यांनी कडेया यांच्या ऑफिसवर दगडफेक करत जोरदार घोषणाबाजी केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 05, 2025 | 02:11 PM
'मी मराठी शिकणार नाही...", मनसे स्टाईल दणका, उद्योजक सुशील केडियांचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं (फोटो सौजन्य-X)

'मी मराठी शिकणार नाही...", मनसे स्टाईल दणका, उद्योजक सुशील केडियांचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

MNS Attack on Sushil Kedia Office : मुंबईतील उद्योजक सुशील केडिया यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना सोशल मीडियाद्वारे मराठी भाषेच्या मुद्द्यावर आव्हान दिले होते. त्यांनी मनसे प्रमुखांच्या गैरवर्तनाच्या निषेधार्थ मराठी शिकणार नाही असे म्हटले होते. त्यानंतर आता संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी उद्योजक सुशील कोडिया यांच्या मुंबईमधील ऑफिसची तोडफोड केली आहे.

Raj Thackeray Speech : सन्माननीय उद्धव ठाकरे…मंचावर येताच राज ठाकरेंच पहिला शब्द!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी शनिवारी गुंतवणूकदार सुशील केडिया यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. तोडफोडीची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. गुंतवणूकदार सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना एका पोस्टमध्ये टॅग करून लिहिले की, मी मराठी शिकणार नाही. या पोस्टनंतर त्यांना धमक्या येत होत्या. केडिया यांनी ‘एक्स‘ वर लिहिले होते की, “मुंबईत ३० वर्षे राहूनही मला मराठी नीट येत नाही आणि तुमच्या घोर गैरवर्तनामुळे मी असा निर्धार केला आहे की जोपर्यंत तुमच्यासारखे लोक मराठी माणसाची काळजी घेत असल्याचे भासवत राहतील तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही. तुम्हाला काय करायचंय बोला असं म्हटले होते.

गुंतवणूकदार सुशील केडिया यांनी राज ठाकरेंबद्दल केलेल्या पोस्टला उत्तर देताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केडिया यांना म्हटले होते की, ‘जर तुम्ही व्यापारी असाल तर व्यवसाय करा; आमच्या वडिलांसारखे वागण्याचा प्रयत्न करू नका. जर तुम्ही महाराष्ट्रात मराठीचा अपमान केला तर तुमच्या तोंडावर थाप मारली जाईल. तुमच्या मर्यादेत राहा.’

राज ठाकरेंना धमकी देणं पडलं महागात; उद्योजक सुशील केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं#RajThackeray #MNS #SushilKedia #PoliticalControversy #MarathiNews pic.twitter.com/gt26tKS6w7 — Navarashtra (@navarashtra) July 5, 2025

देशपांडे यांच्या पोस्टनंतर केडिया यांनी पोलिसांशी संपर्क साधला होता आणि त्यांच्या सोशल मीडिया पोस्टसाठी त्यांना धमक्या मिळत असल्याचा दावा केला होता. केडिया यांनी त्यांच्या पोस्टमध्ये मुंबई पोलिसांना टॅग केले होते, त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधला. केडिया यांनी शुक्रवारी ‘एक्स‘ वर आणखी एक पोस्ट केली होती, ज्यात म्हटले होते की, राज ठाकरे, तुमचे शेकडो कार्यकर्ते जरी मला धमक्या देत राहिले तरी मी अस्खलित मराठी बोलू शकणार नाही. समजून घ्या, प्रेम करा, धमक्या नाही, लोकांना एकत्र आणते.

“मराठी बोलणार नाही, परदेशात जाणार”

उद्योगपती सुशील केडिया यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, ते मराठी बोलणार नाहीत असे म्हणणे योग्य नाही. जे म्हणतात की ते मराठी बोलणार नाहीत, ते परदेशात जाऊन इंग्रजी बोलतात.

गुंतवणूकदार सुशील केडिया यांनी पोलिसांकडून संरक्षण मागितले

शुक्रवारी उद्योगपती सुशील केडिया यांनी इन्स्टाग्रामवर आणखी एक पोस्ट लिहिली की, “श्री. राज ठाकरे, तुमचे शेकडो कार्यकर्ते जरी मला धमक्या देत राहिले तरी मी अजूनही अस्खलित मराठी बोलू शकणार नाही. हे समजून घ्या. धमक्या नाही तर प्रेम लोकांना एकत्र आणते.” त्यांनी इन्स्टाग्रामवर लिहिले की, “मुंबई पोलिस आयुक्त, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृपया लक्ष द्या, राज ठाकरे यांचे कार्यकर्ते मला उघडपणे हिंसाचाराची धमकी देत ​​आहेत. मला सुरक्षा द्या.”

मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता

अलीकडेच, मराठी न बोलल्याबद्दल मीरा रोड येथील एका दुकान मालकावर मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता आणि हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला होता. त्यानंतर सुशील केडिया यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. गुरुवारी, मीरा रोडवरील शेकडो दुकानदार आणि व्यापाऱ्यांनी या हल्ल्याचा निषेध करत रस्त्यावर उतरून दुकाने बंद ठेवली. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि नंतर नोटीस देऊन त्यांना सोडून दिले. त्याच वेळी, राज ठाकरेंच्या पक्षाने हल्ल्याबद्दल माफी मागण्यास नकार दिला आहे.

Raj Thackeray Live: “आम्हाला एकत्र आणणे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांना…”; राज ठाकरेंचा

Web Title: Businessman sushil kedia office vandalized by mns supporters news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2025 | 02:09 PM

Topics:  

  • Mumbai
  • raj thackeray

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
1

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Mumbai News : “आता आश्वासन नको…”, आझाद मैदानावर पगडी धारकांचा धडक मोर्चा
2

Mumbai News : “आता आश्वासन नको…”, आझाद मैदानावर पगडी धारकांचा धडक मोर्चा

मोठी बातमी! बिग बॉस फेम शिव ठाकरेच्या घराला भीषण आग, Video व्हायरल
3

मोठी बातमी! बिग बॉस फेम शिव ठाकरेच्या घराला भीषण आग, Video व्हायरल

महाराष्ट्र पोलिसांना सलाम! लोकलमधील एकट्या महिलेच्या सुरक्षेसाठी राहिले बसून, Video Viral
4

महाराष्ट्र पोलिसांना सलाम! लोकलमधील एकट्या महिलेच्या सुरक्षेसाठी राहिले बसून, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.