पुणे : पुणे पोर्शे अपघात प्रकरणामध्ये आता ससून रुग्णालय दाखल झाले आहे. अल्पवयीन आरोपी मुलाचे रक्ताचे नमुने घेण्यात आल्यानंतर ते ससूनमध्ये चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. मात्र आरोपीचे रक्ताचे नमुने फेकून देत अज्ञात दुसऱ्याचे मुलाचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले. यानंतर ससून रुग्णालयातील तीन जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. यानंतर आता धक्कादायक बाब समोर आली आहे. ससून रुग्णालयातील रक्त चाचणी विभागातील एक कर्मचारी पळून गेल्याची माहिती समोर येत आहे.
रक्त तपासणी विभागाची चौकशी
ससून रुग्णालयामध्ये रक्त चाचणी विभागामध्ये गैरप्रकार घडल्याचा समोर आला आहे. या प्रकरणामध्ये ससूनमधील दोन डॉक्टरसह एक शिपाई अशा तीन जणांना अद्याप ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास आता समिती स्थापन करण्यात आली आहे. डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती आपला अहवाल सरकारकडे सादर करणार आहे. या प्रकरणामध्ये आज रक्त तपासणी विभागाची चौकशी केली जाणार आहे. त्यापूर्वी आता एका कर्मचाऱ्याने चौकशीच्या भीतीपोटी पळ काढल्याचा समोर आले आहे. हा कर्मचारी देखील रक्त तपासणी विभागातील आहे.
कर्मचारी नॉट रिचेबल
पुणे कल्याणीनगर येथील अपघाताचा तपास ससून रुग्णालयापर्यंत येऊन पोहचला आहे. या प्रकरणामध्ये ससून रुग्णालयातील काही कर्मचारी व डॉक्टर देखील असल्याचे निदर्शनास आले आहे. तीन लाख रुपये घेऊन अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅपल कचरा पेटीमध्ये टाकल्याचा आरोप डॉ. अजय तावरे आणि श्रीहरी हरनोर यांच्यावर करण्यात आला आहे. यांना अटक देखील झाली आहे. याप्रकरणामध्ये आज रक्त तपासणी विभागातील प्रत्येकाचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. मात्र या तपासणीच्या आधीच एक कर्मचारी नॉट रिचेबल असून पळून गेल्याचा प्रकार घडला आहे.