Big Breaking: मंत्री छगन भुजबळांची तब्येत बिघडली; विशेष विमानाने आणले मुंबईत
महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना विशेष विमानाने पुण्यावरून मुंबईत आणण्यात आले आहे. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची तब्येत अचानक बिघडली आहे. त्यांना तातडीने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. छगन भुजबळ यांना पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणण्यात आले. छगन भुजबळ यांना नेमका काय त्रास होत आहे हे कळू शकले नाही. मात्र प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णायालय तातडीने दाखल करण्यात आले आहे.
छगन भुजबळ जे राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधले ते मोठे नेते आहेत. सध्या सुरू असलेल्या आरक्षणाच्या विषयात ते ओबीसी समाजचे नेतृत्व देखील करत आहेत. छगन भुजबळ यांना २०२२ मध्ये देखील अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळेस देखील त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते.
राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या गोटात काही ना काही हालचाली पाहायला मिळत आहे. प्रचारासाठी महत्वाचे नेते राज्यभर दौरे करत आहेत. सातत्याने होणाऱ्या प्रवासामुळे तब्येत बिघडण्याची शक्यता असते. दरम्यान भुजबळ यांना नेमका कशाचा त्रास होत आहे हे समोर येऊ शकले नाही. मात्र त्यांना पुण्यावरून विशेष विमानाने मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून भुजबळांवर उपचार सुरू आहेत.