Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यात किडनी रुग्णांना दिलासा! डायलिसीसच्या सोयीमुळे रुग्णांना स्थानिक पातळीवर उपचाराची मिळणार सुविधा

किडनीचे विकार झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. राज्यातील पाच जिल्ह्यांमधील सहा शासकीय आरोग्य संस्थांमध्ये नवीन डायलिसीस युनिट्स सुरू करण्यात आली आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 12, 2026 | 11:01 AM
राज्यात किडनी रुग्णांना दिलासा! डायलिसीसच्या सोयीमुळे रुग्णांना स्थानिक पातळीवर उपचाराची मिळणार सुविधा

राज्यात किडनी रुग्णांना दिलासा! डायलिसीसच्या सोयीमुळे रुग्णांना स्थानिक पातळीवर उपचाराची मिळणार सुविधा

Follow Us
Follow Us:

किडनीविकारांचे प्रमाण वाढत असताना आणि डायलिसीससारख्या उपचारांची गरज सातत्याने वाढत असतानाच राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यातील पाच जिल्ह्यांमधील सहा शासकीय आरोग्य संस्थांमध्ये नवीन डायलिसीस युनिट्स सुरू करण्यात आली असून, त्यामुळे किडनी विकारग्रस्त रुग्णांना त्यांच्या जिल्ह्यातच दर्जेदार व परवडणारी सेवा मिळणार आहे. यामुळे उपचारांसाठी दूरच्या महानगरांकडे धाव घेण्याची गरज कमी होणार असून रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.(फोटो सौजन्य – istock)

Mumbai Monorail News: मे महिन्यापासून मोनो ट्रॅकवर धावणार! नवीन रेकच्या संचालनासाठी हालचालींना वेग; ‘सेफ्टी ऑडिट’ची प्रतीक्षा

मधुमेह, उच्च रक्तदाब आणि बदलती जीवनशैली यांमुळे किडनीविकारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत प्राथमिक व दुय्यम आरोग्य संस्थांमध्ये डायलिसीससारख्या सुविधा उपलब्ध होणे ही काळाची गरज आहे. भविष्यात आणखी जिल्ह्यांमध्ये अशा युनिट्स सुरू करण्याचा आराखडा असून, किडनी रुग्णांसाठी परवडणारी उपचारव्यवस्था उभा राहील.

खाजगी रुग्णालयांचा आधार

आतापर्यंत अनेक जिल्ह्यांतील रुग्णांना डायलिसीससाठी शेजारच्या जिल्ह्यात किंवा खासगी रुग्णालयांमध्ये जावे लागत होते. त्यामुळे प्रवासाचा खर्च, उपचारांचा वाढता आर्थिक भार आणि वेळेचा अपव्यय अशी त्रिकूट समस्या निर्माण होत होती. नव्याने सुरू झालेल्या या युनिट्समुळे रुग्णांना स्थानिक पातळीवरच नियमित डायलिसीस सुविधा उपलब्ध होणार, ज्याचा थेट फायदा ग्रामीण व निमशहरी भागातील नागरिकांना होणार आहे. या डायलिसीस युनिट्समध्ये आधुनिक यंत्रसामग्री, प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग स्टाफ व तांत्रिक कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक त्या सुरक्षितता उपाययोजना, स्वच्छता मानके आणि उपचार प्रोटोकॉल काटेकोरपणे राबवले जाणार आहेत.

Rohit Pawar PC: ‘हा घातपात असू शकतो अशी मला शंका..; रोहित पवारांना संशय

ग्रामीण व निमशहरी भागातील रुग्णांना थेट लाभ, आधुनिक यंत्रसामग्री व प्रशिक्षित उपलब्धता मनुष्यबळाची, सुरक्षितता व स्वच्छतेचे मानक प्रोटोकॉल लागू, भविष्यात आणखी जिल्ह्यांत डायलिसिस युनिकसुरु करण्याचा आराखडा करण्यात आला आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Relief for kidney patients in the state due to the facility of dialysis the patients will get the facility of treatment at the local level

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 11:01 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • Hospital News
  • Kidney Health Tips

संबंधित बातम्या

पोटात साचून राहिलेल्या गॅसमुळे अपचनाच्या समस्या वाढल्या आहेत? ‘या’ पद्धतीने करा ओव्याचे सेवन, पचनक्रिया राहील सुरळीत
1

पोटात साचून राहिलेल्या गॅसमुळे अपचनाच्या समस्या वाढल्या आहेत? ‘या’ पद्धतीने करा ओव्याचे सेवन, पचनक्रिया राहील सुरळीत

Sweets Cravings: सतत गोड खावंसं का वाटतं? शरीराच्या ‘या’ संकेतांकडे दुर्लक्ष करू नका
2

Sweets Cravings: सतत गोड खावंसं का वाटतं? शरीराच्या ‘या’ संकेतांकडे दुर्लक्ष करू नका

किडनी स्टोनमुळे वारंवार पोटात वेदना होतात? मग ‘या’ पद्धतीने करा लिंबू पाण्याचे सेवन, लघवीवाटे स्टोन पडून जाईल बाहेर
3

किडनी स्टोनमुळे वारंवार पोटात वेदना होतात? मग ‘या’ पद्धतीने करा लिंबू पाण्याचे सेवन, लघवीवाटे स्टोन पडून जाईल बाहेर

‘ट्रॉमा ‘तील कामगारांचा संघर्ष सुरूच! कंत्राटदार बदलत राहिल्याने कामगारांच्या हक्कांवर गदा येत असल्याने नाराजी
4

‘ट्रॉमा ‘तील कामगारांचा संघर्ष सुरूच! कंत्राटदार बदलत राहिल्याने कामगारांच्या हक्कांवर गदा येत असल्याने नाराजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.