
Candidates have started giving interviews to political parties for the Parbhani Municipal Corporation election
बाळासाहेब काळे : परभणी : साधारणतः नऊ वर्षाच्या कालावधीनंतर होत असलेल्या परभणी महानगरपालिका निवडणुकीचा बिगूल वाजताच सर्वच पक्ष स्वबळाचा नारा देत इच्छुकांच्या मुलाखती घेताना दिसत आहेत. यात भाजप, राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष काँग्रेसकडून सत्ता खेचून घेण्यासाठी जोरदार तयारी करत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून मनपा निवडणुकीची विविध पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. मागच्या वेळच्या मनपावर काँग्रेसची सत्ता होती. त्याला सुरुंग लावण्यासाठी राष्ट्रवादी व भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. साडेतीन वर्षापूर्वीच मागील सभागृहाचा कार्यकाळ संपलेला आहे, तेव्हापासून मनपाचा कारभार प्रशासक पाहत आहेत.
या कार्यकाळात मनपाची आर्थिक घडी बिघडली आणि कर्मचारी वेतन अनेकदा रखडण्याइतपत अक्षम मनपा झाल्याचे दिसून आले. प्रशासकांच्या काळात कर्मचाऱ्यांतील शिस्त पूर्णपणे गायब झाली, मुजोर अधिकाऱ्यांनी वसुली न करताच मनपाचा सेस टक्केवारीच्या कामांवर खर्च केल्याने आता मनपावर कर्ज काढण्याची वेळ आली आहे. आता प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम सुरू झाला असल्याने अनेक वार्डात चुरशीच्या लढती होणार आहेत. शहरातील १६ प्रभागांतून ६५ नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. प्रभाग रचना जुनीच कायम असली, तरीही काही प्रमाणात त्यात बदलही झाला आहे.
हे देखील वाचा : महिलांचा अपमान थांबणार कधी? नीतीश कुमारांच्या हिजाब ओढण्याने दुखावली डॉक्टर, थेट सोडला बिहार
दीड लाखांवर मतदार
या मनपा निवडणुकीसाठी १ लाख ६१ हजार मतदारसंख्या आहे. मागच्यावेळी २ लाख १२ हजार ८८० मतदार होते. यात ४८ हजार ५३५ मतदारांची वाढ झाली आहे. शहरात मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३३८ केंद्र स्थापन केले असून उपकेंद्रांसह ती ३५० पर्यंत जाऊ शकते. जिल्हा वार्तापत्र परभणी मनपाच्या एकूण ६५ जागांपैकी ३९ जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहेत. यातील १९ जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी १७ जागा असून यातील ९ महिलांसाठी आहेत. अनुसूचित जातीच्या ८ पैकी ४ जागा महिलांसाठी आहेत. तर अनुसूचित जमातीची एकमेव जागा महिलेसाठी आरक्षित झाली आहे. यावेळी मतदार यादीवर १ तब्बल १६६१ आक्षेप आले होते. अनेक भागांतील मतदारांनी आपल्या प्रभागाबाहेर जाऊन मतदान कसे करायचे? असा सवाल करत होते.
हे देखील वाचा : “मारली लाथ काँग्रेसने…मनसेच्या पांगुळ गाड्याची आशा; उद्धव ठाकरेंना आशिष शेलारांनी खास कवितेतून डिवचलं
नवा पर्याय मिळणार
मागच्या निवडणुकीत काँग्रेसविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनेच लढत दिली होती. त्यांच्याही १२ जागा निवडून आल्या होत्या. आता त्यांच्या पक्षाचे दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटात असलेल्या अनेकांनी ऐनवेळी सत्तेची सोबत देत अजित पवार गटात उड्या घेतल्या. शिवाय इनकमिंगच्या भरवशावर यंदा सत्तेवर दावा केला जात आहे. मागच्या सभागृहात भाजपचे ८ तर एकसंघ शिवसेनेचे ५ नगरसेवक होते. या निवडणुकीत भाजप जोरदार हालचाली करीत आहे. तर शिवसेनेचे शिंदे व ठाकरे हे दोन्ही गट कामाला लागले आहेत.
मागील सभागृहात काँग्रेसचे सर्वाधिक ३१ नगरसेवक निवडून आले होते. यावेळी पक्षांतराने जुन्या अनेकांना नवा पर्याय मिळणार आहे. जेवढचा जागा रिकाम्या झाल्या, त्या ठिकाणी नव्यांना लढण्याची संधी मिळणार आहे. सर्वच पक्षांनी स्वबळाचा नारा दिलेला असला तरी पक्षीय पातळीवर महाविकास आघाडी किंवा महायुती तील घटक पक्ष एकत्र आले तर निवडणुकीचे चित्र बदलू शकते.