परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीसाठी 18जून रोजी मतदान तर २० जूनला निकाल लागणार आहे. अजित पवार गट आणि भाजपची ताकद लक्षात घेता महायुती मजबूत स्थितीत असल्याची चर्चा रंगली आहे.
जल जीवन मिशनमधील कर्मचाऱ्यांचे सुमारे ५ ते ६ महिने, तर स्वच्छ भारत मिशनमधील कर्मचाऱ्यांचे ३ ते ४ महिने मानधन प्रलंबित आहे. मागील ७८ महिन्यांत केवळ एकदाच मानधन मिळाले आहे.
परभणीचे खासदार संजय जाधव हे शिवसेना सोडून इतर पक्षात जाणार असल्याचे चर्चा जोर धरत असतानाच मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मोजणी मोहीम ३० एप्रिल रोजी गारखेडा येथून सुरू झाली असून, २० मे रोजी शाहूनगरवाडी व गारखेडा येथील कामकाजाने पूर्ण होणार आहे.
परभणी जिल्ह्याचे तापमान मागील एप्रिल महिन्यामध्ये सरासरीपेक्षा चार अंश डिग्री सेल्सिअस म्हणजेच तब्बल 44 अंश डिग्री सेल्सिअस एवढे वाढले आहे मे महिन्यात देखील या तापमानामध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे.
आरोग्य व पोषण, शिक्षण, कृषी व जलसंपदा, आर्थिक समावेशन, कौशल्य विकास आणि मूलभूत पायाभूत सुविधा या NITI AAYC मुख्य क्षेत्रांवर विशेष भर देणारा हा कार्यक्रम स्पर्धात्मक व सहकारात्मक संघराज्यावर आधारित…
परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील पडेगाव येथे अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा हटवण्यावरून वाद झाला असून रात्र पासून जिल्हाभरातील पोलीस पडेगावमध्ये तळ ठोकून आहेत.
ग्रामरोजगार सेवकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सुमारे 700 ग्रामरोजगार सेवकांनी 1 एप्रिलपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
परभणीमध्ये इयत्ता दुसरी ते इयत्ता आठवी तसेच इयत्ता नववी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांची पट पडताळणी दिनांक ११ ते २२ एप्रिल २०२६ या कालावधीत करण्यात येणार आहे.
Central District Bank Director : बॅकिंग कायदा सुधारणा अधिनियमाची अंमलबजावणी होणार असल्याने वर्षानुवर्षे जिल्हा बँकेवर वर्चस्व राखून राजकारण करत आलेल्या मंडळींना मोठा दणका बसणार आहे.
परभणी रेल्वे स्थानकावर आरपीएफ जवानाने एका प्रवाशाचा जीव वाचवला असून दुसऱ्या घटनेत सेलू येथे हरवलेली पर्स प्रवाशाला परत करण्यात आली. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक होत आहे.
Maharashtra Politics : परभणी जिल्हा परिषदेच्या निवडणूकीनंतर महायुतीमध्ये वाद निर्माण झाला आहे. शिंदे सेना ही भाजपवर नाराज असल्याचे स्पष्टपणे उघड होत आहे.
परभणी जिल्हा परिषदेमध्ये आम्ही शिवसेना शिंदे गटाला सोबत घेऊनच जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करतात होतो तशा प्रकारचा निर्णय देखील पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी जाहीर केला होता.