Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ST Bus News : सवलतीच्या दरात सुरक्षित देवदर्शन योजना! बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त उपक्रमाचे आयोजन

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) मार्फत "एसटी संगे तीर्थाटन" ही विशेष धार्मिक पर्यटन योजना सवलतीच्या दरात सुरू करण्यात आली आहे. याचा अनेकांना फायदा होत आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 03, 2026 | 05:53 PM
एसटी कामगारांचे 'बोंब मारो' स्थगित

एसटी कामगारांचे 'बोंब मारो' स्थगित

Follow Us
Follow Us:

ST Bus News : हिंगोली : हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भाविकांसाठी दिलासादायक उपक्रम राबविण्यात येत असून, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) मार्फत “एसटी संगे तीर्थाटन” ही विशेष धार्मिक पर्यटन योजना सवलतीच्या दरात सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश सर्वसामान्य प्रवाशांना सुरक्षित, सोयीस्कर व किफायतशीर दरात देवदर्शन घडवून आणणे हा आहे.

या योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, वसमत व कळमनुरी या तीनही आगारांतून विशेष नियोजन करण्यात आले असून, प्रत्येक आगारातून किमान पाच बसेस राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ४० प्रवाशांचा गट पूर्ण झाल्यास मागणीनुसार तात्काळ नवी कोरी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सध्या या योजनेची व्यापक जनजागृती सुरू आहे. “स्वस्त, सुरक्षित व विश्वासार्ह प्रवास” या ब्रीदवाक्यावर आधारित ही योजना खासगी ट्रॅव्हल्सच्या तुलनेत कमी दरात व अधिक सुरक्षित प्रवासाची हमी देणारी ठरणार आहे.

हे देखील वाचा : हिंगोली जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख उंचावतोय; ठोस पाऊले उचलण्याची नागरिकांची मागणी

या विशेष तीर्थाटन व पर्यटन सहलींमध्ये अष्टविनायक, ज्योतिर्लिंग दर्शन, सोमवार महादेव दर्शन, नवरात्रोत्सव काळात साडेतीन शक्तीपीठ दर्शन, अक्कलकोट, पंढरपूर तसेच किल्ले, सागरी पर्यटन स्थळे, ताडोबा, चिखलदरा आदी पर्यटनस्थळांचा समावेश करण्यात आला आहे. शालेय सुट्ट्या, सलग सुट्ट्यांचा कालावधी व उत्सव काळ लक्षात घेऊन सहलींचे नियोजन केले जाणार आहे. सहलीचे नियोजन करताना सामाजिक संस्था व देवस्थान ट्रस्ट यांच्या सहकार्याने निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात येणार असून, मात्र निवास, चहापान व नाश्त्याचा खर्च प्रवाशांना स्वतः करावा लागणार आहे. प्रवासाचा कालावधी एक किंवा अधिक दिवसांचा असू शकतो व अंतरानुसार तिकीट दर निश्चित करण्यात येणार आहेत.

हे देखील वाचा : राष्ट्रवादी पक्षाला पुन्हा उभारी! तीन दिवसांच्या शोककाळानंतर मावळ तालुक्यात उमेदवारांच्या भेटीगाठी

सर्व शासकीय सवलती लागू

या योजनेत राज्य शासनाच्या सर्व सामाजिक सवलती लागू राहणार आहेत. ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना अमृत महोत्सव’ योजनेअंतर्गत मोफत प्रवास महिलांसाठी ‘महिला सन्मान’ योजनेत ५० टक्के सवलत इतर सामाजिक घटकांसाठी लागू असलेल्या सवलती जशाच्या तशा ही योजना २६ जानेवारीपासून राज्यातील २५१ आगारांत एकाच वेळी राबविण्यात येत असून, हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही आगारांचा त्यात समावेश आहे. या उपक्रमामुळे धार्मिक व पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार असून, सर्वसामान्य भाविकांना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व अध्यात्मिक वारशाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

Web Title: St bus travel at discounted rates to visit tourist places in hingoli district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 05:53 PM

Topics:  

  • nanded news
  • st bus news
  • ST buses

संबंधित बातम्या

एसटीचे 31 पैकी 21 विभाग तोट्यात; परिवहनमंत्र्यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना दिला ‘हा’ इशारा
1

एसटीचे 31 पैकी 21 विभाग तोट्यात; परिवहनमंत्र्यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना दिला ‘हा’ इशारा

MSRTC Financial Loss: एसटी महामंडळाला ऐन पीक सीझनमध्ये कोट्यवधींचा फटका! एप्रिल-मे महिन्यात अपेक्षित उत्पन्न बुडाले
2

MSRTC Financial Loss: एसटी महामंडळाला ऐन पीक सीझनमध्ये कोट्यवधींचा फटका! एप्रिल-मे महिन्यात अपेक्षित उत्पन्न बुडाले

दोन महिला वकिलांमध्ये हाणामारी, न्यायालयीन परिसरातील वाद चव्हाट्यावर; नेमकं काय घडलं?
3

दोन महिला वकिलांमध्ये हाणामारी, न्यायालयीन परिसरातील वाद चव्हाट्यावर; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.