दहाव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत कॅप्स रेव्हन्स संघाची विजयी सलामी
पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित दहाव्या पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत साखळी फेरीत सलामीच्या लढतीत कॅप्स रेव्हन्स संघाने ब्लॅक हॉक्स संघाचा 6-1 असा पराभव करून विजयी सलामी दिली.
पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या बॅडमिंटन कोर्टवर आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत सलामीच्या लढतीत गोल्ड खुला दुहेरी 1गटात ब्लॅक हॉक्सच्या हर्षद जोगाईकर व तन्मय आगाशे यांनी रेव्हन्सच्या निनाद देशमुख व अनुज मेहता यांचा 21-11, 21-08 असा पराभव करून खाते उघडले. गोल्ड खुला दुहेरी 2 मध्ये रेव्हन्सच्या केदार नाडगोंडे व तन्मय चोभे यांनी ब्लॅक हॉक्सच्या सिध्दार्थ साठे व राधिका इंगळहळीकर यांचा 21-09, 21-18 असा पराभव करून संघाला बरोबरी साधून दिली.
दुहेरी 3मध्ये यांची चमकदार कामगिरी
त्यानंतर खुला दुहेरी 3मध्ये रेव्हन्सच्या विमल हंसराज व चंद्रशेखर आपटे यांनी गंधार देशपांडे व मधुर इंगळहळीकर यांचा 21-16, 21-16 असा तर, महिला दुहेरी 4मध्ये रेव्हन्सच्या संस्कृती जोशी व प्रांजली नाडगोंडे यांनी ईशा साठे व ईशा घैसास यांचा 21-19, 21-05 असा पराभव करून संघाची 3-1 ने आघाडी वाढवली. वाईजमन दुहेरी 5मध्ये रेव्हन्सच्या अजय पटवर्धनने हरीश अय्यरच्या साथीत हॉक्सच्या बाळ कुलकर्णी व संजय शहा यांचा 21-11, 21-08 असा तर, खुला दुहेरी 6मध्ये रेव्हन्सच्या चिन्मय चिरपुटकर व अजिंक्य मुठे यांनी चिन्मय जोशी व हेमंत करमळकर यांचा 15-11, 07-15, 15-09 असा संघर्षपूर्ण पराभव करून हि आघाडी भक्कम केली. अखेरच्या खुला दुहेरी7मध्ये रेव्हन्सच्या देवेंद्र राठी व विष्णू गोखले यांनी हॉक्सच्या निलेश बजाज व आदित्य जितकर यांचा 15-04, 11-15, 15-10 असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला.
याआधी स्पर्धेचे उदघाटन पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, मानद सचिव दिपक गाडगीळ आणि ट्रूस्पेसचे मालक उल्हास त्रिमल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीवायसी हिंदू जिमखानाचे सहसचिव सारंग लागु, क्लबच्या बॅडमिंटन विभागाचे सचिव तन्मय आगाशे, स्पर्धा संचालक नंदन डोंगरे, अभिषेक ताम्हाणे, नंदन डोंगरे, विवेक सराफ, रणजित पांडे, केदार नाडगोंडे, आमोद प्रधान, समीर जालन आणि दिप्ती सरदेसाई आदी मान्यवर उपस्थित होते.