Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सर्व समाजातील विद्यार्थ्यांसाठी एकत्रित…’; चंद्रशेखर बावनकुळे यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Chandrashekhar Bawankule:

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 08, 2026 | 08:45 PM
Chandrashekhar Bawankule

Chandrashekhar Bawankule

Follow Us
Follow Us:
  • सर्व समाजातील विद्यार्थ्यांसाठी एकत्रित वसतिगृहांची संकल्पना
  • जिल्हाधिकाऱ्यांनी १३ ऑक्टोबरपर्यंत सोयीस्कर जागांचे प्रस्ताव पाठवावेत
  • जिल्हास्तरावर ५०० विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह उभारण्याचे नियोजन
मुंबई/Chandrashekhar Bawankule: आदिवासी, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय, मराठा तसेच सर्व समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहांऐवजी भविष्यात एकाच ठिकाणी सर्व समाजातील विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून देणारी एकत्रित वसतिगृहांची संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्यानुसार विभागीय स्तरावर सुमारे १ हजार विद्यार्थी क्षमतेचे, तर जिल्हास्तरावर ५०० विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह उभारण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या वसतिगृहांसाठी योग्य व सोयीस्कर शासकीय जागा निश्चित करून त्यांचे प्रस्ताव १३ ऑक्टोबरपर्यंत पाठवावेत, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागाच्या वसतिगृहांसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार संजय बनसोडे, महसूल विभागाचे सहसचिव सं. द. सूर्यवंशी, सहसचिव मनीषा जायभाये, उपसचिव गौरी म्हस्के, उपसचिव भगवान सावंत, इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागाच्या सहसंचालक स्नेहा देवकाते उपस्थित होते. तसेच राज्यातील सर्व जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, वसतिगृहाची जागा निश्चित करताना केवळ उपलब्ध जागा पाहू नये, तर विद्यार्थी म्हणून त्या ठिकाणाचा विचार करावा. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, ये-जा करण्यासाठी आणि दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी सोयीची जागा असावी. परिसरातील पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि भविष्यातील विस्ताराची शक्यता लक्षात घेऊन जागा निश्चित करावी.

Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून काँग्रेसने सरकारला घेरलं, आदिवासी विद्यार्थ्यांचा लढा पेटला!

राज्यात यापूर्वी विविध समाजघटकांसाठी स्वतंत्र वसतिगृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, पुढील काळात उभारण्यात येणाऱ्या वसतिगृहांमध्ये सर्व समाजातील विद्यार्थ्यांना एकत्रितपणे निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याची संकल्पना राबविण्यात येणार आहे. सामाजिक समरसतेला चालना देतानाच विद्यार्थ्यांना दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हा या संकल्पनेचा उद्देश असल्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

महाज्योतीच्या प्रस्तावांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा

महाज्योतीमार्फत वसतिगृहांसाठी मागणी करण्यात आलेल्या जागांबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करावी. चंद्रपूर, बीड, परभणी, धाराशिव, नांदेड, सांगली, सोलापूर, अकोला, यवतमाळ, गोंदिया आणि वाशिम या जिल्ह्यांतील जागांबाबत आवश्यक कार्यवाही करून प्रस्ताव शासनाकडे पाठवावेत,असे महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले. काही ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्याबाबत शासनस्तरावर निर्णय झालेला असतानाही संबंधित जागांचे प्रॉपर्टी कार्ड अद्याप पूर्ण झालेले नसल्याने पुढील कार्यवाही प्रलंबित आहे. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी प्रॉपर्टी कार्डची कार्यवाही पूर्ण करून आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव शासनाकडे सादर करावेत, अशा सूचना देण्यात आल्या.

विद्यार्थीकेंद्री दृष्टिकोनातून जागांची निवड

वसतिगृहांसाठी जागा सुचविताना विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून विचार करण्याचे आवाहन मंत्री बावनकुळे यांनी केले. वसतिगृहाची जागा शैक्षणिक संस्था, सार्वजनिक वाहतूक, आरोग्य सुविधा, बाजारपेठ आणि इतर आवश्यक सुविधांच्या दृष्टीने सोयीची असावी. तसेच भविष्यातील वाढ लक्षात घेऊन आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यास पुरेशी जागा उपलब्ध असावी, याचा विचार जिल्हाधिकाऱ्यांनी करावा, असे त्यांनी सांगितले.

Sindhudurga News: परप्रांतीयांच्या शेतजमीन खरेदीची SIT चौकशी; बावनकुळे यांचे स्पष्ट निर्देश

महाज्योतीच्या जागांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी किमान १ हजार विद्यार्थ्यांच्या क्षमतेचे वसतिगृह उभारता येईल, अशा स्वरूपाचे प्रस्ताव तयार करावेत. उपलब्ध जागा, तिचे क्षेत्रफळ, स्थान, दळणवळणाची सुविधा, परिसरातील शैक्षणिक व नागरी सुविधा आणि भविष्यातील विस्ताराची शक्यता यांचा सविस्तर विचार करून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जिल्ह्यांकडून प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांच्या आधारे सर्व समाजातील विद्यार्थ्यांसाठी एकत्रित वसतिगृह योजनेचा शासनस्तरीय आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

Web Title: Chandrashekhar bawankule said concept of integrated hostels for students from all communities

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 08:45 PM

Topics:  

  • chandrashekhar bawankule
  • Tribal Community
  • Tribal Department

संबंधित बातम्या

Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून काँग्रेसने सरकारला घेरलं, आदिवासी विद्यार्थ्यांचा लढा पेटला!
1

Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून काँग्रेसने सरकारला घेरलं, आदिवासी विद्यार्थ्यांचा लढा पेटला!

Jalgaon News: ‘शेतकरी आत्महत्या झाल्यास बँका जबाबदार!’ दुष्काळ पाहणीनंतर बावनकुळेंचा मोठा इशारा
2

Jalgaon News: ‘शेतकरी आत्महत्या झाल्यास बँका जबाबदार!’ दुष्काळ पाहणीनंतर बावनकुळेंचा मोठा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.