Assembly Elections 2024: "हरयाणा आणि जम्मू काश्मीरचे निकाल हे..."; चंद्रशेखर बावनकुळेंनी केले मोठे वक्तव्य
मुंबई: आज हरयाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभेची मतमोजणी सुरू आहे. सध्या स्थितीनुसार हरयाणात पिछाडीवर गेलेल्या भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारलेली पाहायला मिळत आहे. दरम्यान कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच निवडणूक झाली आहे. तर जम्मू काश्मीरमधील आकड्यांनुसार सध्या कॉँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्ष यांची आघाडी पुढे असून , भाजप पिछाडीवर आहे. दरम्यान यावर महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. दोन्ही राज्यांतील निकाल हे आम्हाला मजबूती देणारे असतील असे प्रदेशाध्यक्ष म्हणाले आहेत.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “हरयाणा आणि जम्मू काश्मीरमधील येणारे निकाल आम्हाला मजबूती देणारे असतील आहेत. मागील वेळेपेक्षा यंदा आम्हाला जास्तच यश मिळेल. कारण आम्ही त्या ठिकाणी जनतेचे प्रश्न सोडवले आहेत. तसेच काश्मीरमध्ये ३७० सारखे कलम हटवले आहे. ” सध्या हरयाणात भाजप आघाडीवर आहे. तर जम्मू काश्मीरमध्ये कॉँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांची आघाडी पुढे आहेत. भाजप या राज्यात पिछाडीवर आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील निवडणुकीबाबत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “आम्ही विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठीच लढणार आहे. दसऱ्याचा सण जवळ आला आहे. त्यामुळे दसरा झाला की, यांचे जागावाटप पूर्ण होईल अशी शक्यता आहे. संजय शिरसाट यांनी जे अडीच वर्षाचे मुख्यमंत्री याबाबत वक्तव्य केले आहे, त्यावर राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे स्पष्टीकरण देतील.”
जागावाटपावर बोलायचे झाले तर, भाजपचे जागावाटप हे केंद्रीय पार्लमेंट्री बोर्ड ठरवेल. तसेच महायुतीमधील जागावाटप हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्रितपणे निर्णय घेतील. तसेच काही अडचण निर्माण झाल्यास त्यात यांचे केंद्रीय नेते लक्ष घालतील असे, महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.