वर्धा- वर्ध्यात (Wardha) आजपासून सारस्वतांचा मेळा, अर्थात माय मराठीचा जागर होत आहे. वर्ध्यात आजपासून 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) सुरुवात झाली आहे. संमेलनाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश नरेंद्र चपळगावकर (Narendra Chapalgaonkar) आहेत. विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्यावतीने वर्धा येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरीमध्ये 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. स्वावलंबी शिक्षण मंडळाचे पटांगणात साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून साहित्य नगरी सजली आहे. त्यामुळं आजपासून सारस्वतांचा मेळावा भरला आहे. दरम्यान, संमेलानाच्या पहिल्याच दिवशी गोंधळ उडाल्याचे चित्र आहे.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी घोषणाबाजी…
दरम्यान, आज पहिल्या दिवशी विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भाषणावेळी प्रेक्षकांमधून गोंधळ घालण्यात आला. तसेच मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी घोषणाबाजी करण्यात आली. ह्या घोषणा तीन विदर्भावाद्यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावर मुख्यमंत्री बोलताना म्हणाले की, सामान्यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेऊ. पण हे साहित्याचं व्यासपीठं आहे. येथे गोंधळ नको असं मुख्यमंत्री म्हणाले.
वेगळ्या विदर्भासाठी मागणी…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भाषणावेळी प्रेक्षकांमधून गोंधळ घालण्यात आला. तसेच मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी घोषणाबाजी करण्यात आली. ही घोषणाबाजी विदर्भावाद्यांनी कली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच वेगळ्या विदर्भासाठी या घोषणा देण्यात आल्या. यावेळी आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांना काळ झेंडे दाखवत, सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान, यातील काही विदर्भावाद्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
50 लाखांएवजी 2 कोटींचा निधी…
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान वर्ध्यात होत असून संमेलनासाठी ५ कोटींचा खर्च लागणार असा अंदाज समितीकडून व्यक्त केला जात आहे. या संमेलनाकरिता राज्य शासनाच्या वतीने ५० लाखांऐवजी २ कोटींचा निधी दिला जाईल, अशी याआधी मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी घोषण केली होती. निधी देण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आज साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महामंडळाचे अध्यक्ष उषा तांबेंनी आपल्या भाषणात सांगितले की, साहित्य संमेलनाला राज्य शासनाच्या वतीने २ कोटींचा निधी दिला गेला आहे, अशी माहिती तांबेंनी दिली.