Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

छगन भुजबळ गुरुवारी सांगोला तालुक्याच्या दौऱ्यावर; दीपक साळुंखे पाटील यांची माहिती

राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि.७) महुद बु. सांगोला येथे शेतकरी परिषद होत आहे. यावेळी सांगोला तालुक्यातील उद्ध्वस्त झालेल्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विचारमंथन करण्यात येणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 06, 2022 | 01:13 PM
छगन भुजबळ गुरुवारी सांगोला तालुक्याच्या दौऱ्यावर; दीपक साळुंखे पाटील यांची माहिती
Follow Us
Close
Follow Us:

सांगोला / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि.७) महुद बु. सांगोला येथे शेतकरी परिषद होत आहे. यावेळी सांगोला तालुक्यातील उद्ध्वस्त झालेल्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विचारमंथन करण्यात येणार आहे.

रयत शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मैदानावर सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील यांनी माहिती दिली.

महुद (ता.सांगोला) या गावाने लोकसहभागातून राष्ट्रीय जल पुरस्कार मिळवला आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांचे मार्गदर्शन महुदकरांना जलक्रांतीसाठी मिळाले आहे. जलक्रांतीमध्ये योगदान दिल्याबद्दल छगन भुजबळ हे महुद ग्रामस्थांचे गुरुवारी आयोजित शेतकरी परिषदेत कौतुक करणार आहेत. शेतकरी परिषदेसाठी सांगोला तालुक्याचे आमदार शहाजीबापू पाटील, दीपकआबा साळुंखे-पाटील, युवा नेते डॉ. बाबासाहेब देशमुख आदींसह डाळिंब उत्पादक शेतकरी उपस्थित राहणार आहेत.

डाळिंब पंढरी म्हणून सांगोला तालुक्याची देशाच्या नकाशावर ओळख झाली होती. परंतु, वेगाने वाढत चाललेला पिन होल बोरर, तेल्या, मर या रोगांसह नैसर्गिक आपत्तीमुळे डाळिंब पंढरी उध्वस्त झाली आहे. सांगोला तालुक्यातील डाळिंबाच्या बागा निम्म्याहून अधिक कमी झाल्या आहेत. त्यामुळे डाळिंब पंढरीचे उत्पादन वर्षाला ३ हजार कोटी रुपयांवरून यंदा ८०० कोटींपर्यंत कमी झाले. पुढील वर्षी ४०० कोटी मिळेल की नाही? असा गंभीर प्रश्न तयार झाला आहे.

अशा कठीण काळात डाळिंब पंढरी पुन्हा उभी रहावी म्हणून डाळिंब उत्पादकांची बाजू लावून धरणार व यासाठी शेतकरी परिषदेत छगन भुजबळ यांना साकडे घालून सांगोला तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी भरीव निधी व विशेष पॅकेज मिळावे, अशी विनंती भुजबळ यांना करणार असल्याचे दीपक साळुंखे-पाटील यांनी सांगितले.

तरी महुद येथील आयोजित शेतकरी परिषदेस सांगोला तालुक्यातील व सोलापूर जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे दीपक साळुंखे पाटील यांनी केले.

अभिनेते चिन्मय उदगीरकर यांची उपस्थिती

शेतकरी परिषदेसाठी अभिनेते चिन्मय उदगीरकर हे उपस्थित राहणार आहेत. समग्र ग्रामविकासात ब्रँड अमबेसिडर म्हणून चिन्मय यांनी योगदान देण्यास सुरुवात केली आहे. डाळिंब उत्पादक शेतकरी अडचणीत असताना त्यांना भेटून प्रश्न समजून घेण्यासाठी आपण शेतकरी परिषदेला उपस्थित राहणार असल्याचे चिन्मय यांनी म्हटले आहे.

Web Title: Chhagan bhujbal on a visit of sangola taluka on thursday says deepak aba salunkhe patil nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2022 | 01:13 PM

Topics:  

  • Chhagan Bhujbal
  • छगन भुजबळ

संबंधित बातम्या

Nashik Rainfall News: अतिवृष्टीने नाशिकमध्ये हाहा:कार; भुजबळ दौरा सोडून नाशिककडे रवाना
1

Nashik Rainfall News: अतिवृष्टीने नाशिकमध्ये हाहा:कार; भुजबळ दौरा सोडून नाशिककडे रवाना

‘आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही’; छगन भुजबळांची टीका
2

‘आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही’; छगन भुजबळांची टीका

Maharashtra Politics : धनंजय मुंडेंचे ‘ते’ विधान ऐकताच भुजबळांनी थेट…; नेमकं घडलं तरी काय?
3

Maharashtra Politics : धनंजय मुंडेंचे ‘ते’ विधान ऐकताच भुजबळांनी थेट…; नेमकं घडलं तरी काय?

छगन भुजबळांचा आनंद टिकला नाही फार; बेनामी व्यवहार प्रकरणी खटला सुरु
4

छगन भुजबळांचा आनंद टिकला नाही फार; बेनामी व्यवहार प्रकरणी खटला सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.