Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

छगन भुजबळ यांची स्वस्त धान्य दुकानास अचानक भेट; केली ‘ही’ पाहणी

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी चाले (ता. मुळशी) येथील स्वस्त धान्य दुकानास अचानक भेट देऊन तेथे सर्व अटी व नियमांचे पालन केले जाते की नाही याची पाहणी करत याचा प्रत्यय दिला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 28, 2022 | 03:44 PM
छगन भुजबळ यांची स्वस्त धान्य दुकानास अचानक भेट; केली ‘ही’ पाहणी
Follow Us
Close
Follow Us:

मुळशी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी चाले (ता. मुळशी) येथील स्वस्त धान्य दुकानास अचानक भेट देऊन तेथे सर्व अटी व नियमांचे पालन केले जाते की नाही याची पाहणी करत याचा प्रत्यय दिला.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व पुरवठा विभागाचे उपायुक्त त्रिगुण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयएसओ नामांकनासाठीची मोहीम पुणे जिल्ह्यात राबवली जात आहे. त्या नामांकनासाठी आवश्यक असलेल्या अटी व नियमांनुसार रेशन दुकानातील वजनमापे काटा, धान्यवाटप प्रमाणपत्र फलक, दरपत्रक फलक, जिल्हा दक्षता कमिटी बोर्ड, तालुका दक्षता कमिटी बोर्ड, परवाना फलक, अग्निशामक यंत्र, प्रथमोपचार कीट, व्हिजीट बुक, तक्रार पुस्तिका, ऑनलाईन विक्री रजिस्टर या सर्व बाबींची पूर्तता करण्यात आलेली आहे की नाही याची पाहणी करण्यात येत आहे.

जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने, जिल्हा अन्नधान्य वितरण अधिकारी सचिन ढोले सातत्याने तालुकानिहाय आढावा घेत आहेत. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी नायब तहसीलदार सरिता पाटील, पुरवठा निरीक्षक दीपक चव्हाण, मंडळ अधिकारी,तलाठी यांच्या समवेत अचानक भेट देत स्वस्त धान्य दुकानदार धनंजय दाभाडे यांच्या दुकानाची पहाणी केली.

दाभाडे यांनी आयएसओ नामांकन प्राप्त करण्यासाठी आवश्यक अटी व नियमांची पूर्तता केल्याचे व ते प्रामाणिकपणे सेवा करत असल्याचे भुजबळ यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी दाभाडे यांचे कौतुक केले. त्यांच्या रेशन दुकानास आयएसओ प्रमाणपत्र देण्याची सूचना भुजबळ यांनी संबंधितांना दिली.

भुजबळ यांच्या लोकांत जाऊन पाहणी, तपासणी करण्याच्या व जागेवर न्याय देण्याच्या कृतीमुळे ऐन उमेदीतील त्यांच्या कार्यपध्दतीला नव्याने उजाळा मिळाला.

Web Title: Chhagan bhujbal sudden visit to a cheap grain shop takes survey in mulshi nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2022 | 03:44 PM

Topics:  

  • Chhagan Bhujbal
  • छगन भुजबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.