Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: मनपा भरती की विद्यार्थ्यांची फसवणूक? वेगवेगळ्या अर्जांना एकच प्रश्नपत्रिका; उमेदवारांचा संतप्त सवाल!

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या २२२ रिक्त पदांच्या ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ८ आणि ९ जुलै रोजी परीक्षा होणार असून, एकच प्रश्नपत्रिका ठेवल्याने उमेदवारांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 26, 2026 | 03:17 PM
Chhatrapati Sambhajinagar: मनपा भरती की विद्यार्थ्यांची फसवणूक? वेगवेगळ्या अर्जांना एकच प्रश्नपत्रिका; उमेदवारांचा संतप्त सवाल!
Follow Us
Follow Us:
  • मनपा भरती की विद्यार्थ्यांची फसवणूक?
  • वेगवेगळ्या अर्जांना एकच प्रश्नपत्रिका
  • उमेदवारांचा संतप्त सवाल!
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील विविध संवर्गातील २२२ रिक्त पदांच्या भरतीसाठी होणाऱ्या ऑनलाइन परीक्षेच्या प्रक्रियेवर उमेदवारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वेगवेगळ्या पदांसाठी स्वतंत्र अर्ज व स्वतंत्र परीक्षा शुल्क आकारण्यात आले असतानाही प्रत्यक्षात सर्व पदांसाठी एकच प्रश्नपत्रिका ठेवण्यात आल्याने उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. त्यामुळे दोन किंवा अधिक पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना अपेक्षित संधी मिळणार नसल्याची भावना व्यक्त होत आहे.

महापालिकेने विविध संवर्गातील पदांसाठी अर्ज मागविले होते. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून एक हजार रुपये, तर मागास प्रवर्गातील उमेदवारांकडून ९०० रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात आले. या भरती प्रक्रियेसाठी सुमारे २९ हजार उमेदवार पात्र ठरले असून गुरुवारपासून त्यांना ऑनलाइन प्रवेशपत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्याचबरोबर परीक्षेचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे.

उमेदवारांच्या म्हणण्यानुसार, पदांचे स्वरूप वेगवेगळे असल्याने स्वतंत्र परीक्षा घेणे अपेक्षित होते. अनेकांनी एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करत शुल्क भरले आहे. मात्र एकाच प्रश्नपत्रिकेच्या आधारे निवड प्रक्रिया राबविली जात असल्याने एखाद्या पदासाठी संधी न मिळाल्यास दुसऱ्या पदासाठी स्वतंत्र स्पर्धेची संधीही गमावली जाणार असल्याची खंत उमेदवार व्यक्त करीत आहेत.

‘माझं लेकरू परत आलं हो…’, छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या एका मोहिमेने १७ विखुरलेली कुटुंबे पुन्हा जोडली!

दरम्यान, प्रशासनाने या आक्षेपांवर स्पष्टीकरण देताना सर्व पदांसाठी निर्धारित अभ्यासक्रम समान असल्याने एकच परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविली जाणार असून कोणत्याही अफवा किंवा आमिषांना बळी न पडण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

दोन दिवसांत विविध पदांसाठी परीक्षा

दुपारी ८ जुलै रोजी सकाळी ८ वाजता कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), अग्निशामक आणि चालक-यंत्रचालक पदांसाठी परीक्षा होईल. दुपारी १२ वाजता कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), रोखपाल तसेच उद्यान सहाय्यक/कृषी सहाय्यक पदांची परीक्षा घेण्यात येईल. त्यानंतर दुपारी ४ वाजता स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक आणि उपअग्निशमन केंद्र अधिकारी पदांसाठी परीक्षा होणार आहे. ९ जुलै रोजी सकाळी ८ वाजता स्वच्छता निरीक्षक पदासाठी परीक्षा घेतली जाईल. दुपारी १२ वाजता अनुरेखक, सहाय्यक सुरक्षा अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षक पदांसाठी ऑनलाइन परीक्षा होणार आहे.

अभ्यासक्रम समान असल्याने एकच परीक्षा

महापालिकेतील रिक्त पदांच्या भरतीसाठी आयबीपीएस या शासनमान्य संस्थेमार्फत परीक्षा घेतली जात आहे. विविध पदांसाठी भरती असली तरी त्यांचा अभ्यासक्रम समान असल्याने एकच प्रश्नपत्रिका ठेवण्यात आली आहे.

संभाजीनगर पोलिस दलात मोठा फेरबदल, 12 नव्या अधिकाऱ्यांची एंट्री; 4 अधिकारी जिल्ह्याबाहेर

Web Title: Municipal corporation recruitment or fraud against students same question paper for different applications

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 03:17 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Exam News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.