Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vaijapur News: वैजापूरमध्ये प्रशासनाचा ढिसाळ कारभार! महात्मा फुले जयंतीचा शासकीय कार्यालयांना विसर; नागरिकांमधून संताप

वैजापूरमधील पंचायत समिती आणि कृषी कार्यालयांत महात्मा फुले जयंतीचे प्रतिमा पूजन टाळल्याने खळबळ झाल्याचे दिसून येत आहे. शासनाच्या आदेशांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 13, 2026 | 03:35 PM
वैजापूरमध्ये प्रशासनाचा ढिसाळ कारभार! (Photo Credit- X)

वैजापूरमध्ये प्रशासनाचा ढिसाळ कारभार! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • वैजापूरमध्ये प्रशासनाचा ढिसाळ कारभार!
  • महात्मा फुले जयंतीचा शासकीय कार्यालयांना विसर
  • नागरिकांमधून संताप
वैजापूर, (वा.): तालुक्यात सामाजिक क्रांतिकारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी कैली जात असताना दुसरीकडे दुसरीकडे शहरातील काही महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांमध्ये मात्र अधिकाऱ्यांना जयंतीचा विसर पडल्याचे दिसून आले.

शहरातील पंचायत समिती कार्यालय, उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग तसेच उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयात ११ एप्रिल रोजी महात्मा फुले जयंतीनिमित्त कोणताही अधिकृत कार्यक्रम, प्रतिमा पूजन किंवा अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आलेला नसल्याची माहिती समोर आली आहे. दरवर्षी शासनाच्या सूचनांनुसार महापुरुषांच्या जयंतीनिमित्त संबंधित कार्यालयांत त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जाते. तसेच त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन कर्मचाऱ्यांना प्रेरणा देण्याचा उद्देश असतो. मात्र यंदा या तिन्ही कार्यालयांत अशा
तालुका कृषि अधिकारी देजपुर प्रकारचा कोणताही उपक्रम राबविण्यात आला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

महात्मा फुले यांनी शिक्षण प्रसार, स्त्रीशिक्षण, शेतकरी व वंचित घटकांच्या उन्नतीसाठी आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या विचारांचा प्रसार हा शासकीय यंत्रणेचीही जबाबदारी मानली जाते. अशा परिस्थितीत त्यांच्या जयंतीसारख्या महत्त्वाच्या दिवसाकडे दुर्लक्ष होणे ही गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया काही सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी सांगितले की, महापुरुषांच्या जयंती केवळ औपचारिकतेपुरत्या न ठेवता त्यांच्या विचारांचे पालन करणे आवश्यक आहे. परंतु किमान अभिवादन कार्यक्रमही न होणे ही खेदजनक बाब आहे.

Chhatrapati Sambhajinagar: अग्निशमन दलाला हायटेक बूस्टर! पालकमंत्री संजय शिरसाट यांचा पुढाकार; १५.७८ कोटींची यंत्रणा दाखल

दरम्यान, संबंधित कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. भविष्यात अशा घटना टाळून शासनाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करावे. अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, या प्रकारामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शासनाच्या आदेशांची अंमलबजावणी नेमकी कुठे अडते? याचा गंभीर विचार करण्याची वेळ आली आहे. महापुरुषांच्या जयंतीसंदर्भातील शासन परिपत्रक केवळ कागदोपत्री राहते का? असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

सामाजिक माध्यमांवर होतेय टीका

जयंतीचे फोटो काढणे आणि सोशल मीडियावर पोस्ट टाकणे इतकाच शासकीय यंत्रणेचा उत्साह उरला आहे का? अशी टीकाही होत आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागात सामान्य नागरिक, शाळा-महाविद्यालये आणि सामाजिक संस्था स्वतःहून कार्यक्रम आयोजित करत असताना शासकीय कार्यालयांनीच दुर्लक्ष करणे ही संतापजनक मानली जात आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून स्पष्टीकरण मागवावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

“डीजेच्या आवाजाने महापुरुषांची प्रतिमा उंचावत नाही”; जयंतीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शिरसाट यांनी डीजेबंदीचे केले समर्थन

Web Title: Vaijapur government offices neglect mahatma phule jayanti public outrage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 03:34 PM

Topics:  

  • Vaijapur

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.