
Chief Minister Devendra Fadnavis will inaugurate the World Marathi Conference in Goa.
World Marathi Conference in Goa : पणजी (गोवा) जागतिक मराठी अकादमी आयोजित ‘शोध मराठी मनाचा’ या भव्य जागतिक संमेलनाचे ९ जानेवारी रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून, ‘पद्मविभूषण’ डॉ. अनिल काकोडकर हे संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. असे जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी श्रमिक पञकार भवन येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
हेही वाचा : सुवर्णपदक ते राजकीय मैदान! बिहार सरकारमध्ये सर्वात तरुण मंत्री दाखल! श्रेयसी सिंहने घतली मंत्रीपदाची शपथ
या जागतिक मराठी संमेलनात दिले जाणारे मानाचे पुरस्कार यंदा गोव्याच्या उद्योगक्षेत्रातील दिग्गज अनिल खवटे यांना ‘जागतिक मराठी भूषण पुरस्कार’, तर चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते महेश मांजरेकर यांना ‘मराठी जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात येतील. संमेलनाचे कार्याध्यक्ष दशरथ परब व त्यांचे सहकारी संमेलनाच्या आयोजनाची उत्तम तयारी करत आहेत. अशी माहिती रामदास फुटाणे यांनी दिली.यावेळी जागतिक मराठी अकादमी सदस्य,ज्येष्ठ पञकार महेश म्हात्रे,संजय ढेरे, गौरव फुटाणे उपस्थित होते.
हेही वाचा : अखेर संघाची घोषणा! Karun Nair चे चमत्कारिक पुनरागमन! ‘या’ खेळाडूंची प्लेइंग इलेव्हनमध्ये लागली वर्णी
९ ते ११ जानेवारी २०२६ दरम्यान होणाऱ्या संमेलनात, वेगवेगळया क्षेञातील मान्यवर येणार असून उद्घाटन समारंभा दिवशी भाषणे होणार आहेत,तर इतर दोन दिवशी मान्यवरांची मुलाखती होणार आहेत.जागतिक मराठी अकादमीतर्फे दिले जाणारे हे मानाचे सन्मान उद्योग, संस्कृती व कलाक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाला दिलेली संस्थात्मक दाद आहे.ख्यातनाम अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरणाऱ्या ‘शोध मराठी मनाचा’ या संमेलनात जगभरातील कर्तबगार मराठी बांधवांच्या उपस्थितीत या दोन्ही मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे. याशिवाय, गोव्यातील स्थानिक कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार आहेत.