करुण नायर(फोटो-सोशल मीडिया)
Karnataka squad announced for Syed Mushtaq Ali Trophy : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू असून पहिला सामना गमावल्यानंतर, भारतीय संघ आता २२ नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे दूसरा कसोटी सामना खेळणार आहे, त्यासाठी दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी तयारी करत आहे. दरम्यान, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी कर्नाटका संघ जाहीर केला गेला आहे. ज्यामध्ये अनेक नावांचा समावेश करण्यात आला आहे.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २६ नोव्हेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. कर्नाटकने या स्पर्धेसाठी एक मजबूत संघ जाहीर केल्याचे दिसत आहे. या संघात करुण नायर आणि देवदत्त पडिकल सारख्या प्रमुख खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले. या संघाची धुरा मयंक अग्रवालकडे देण्यात आले आहे. ज्यांना दीर्घ विश्रांतीनंतर टी-२० क्रिकेटमध्ये एक महत्त्वाची संधी देण्यात आली आहे.
देवदत्त पडिक्कल सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाचा भाग आहे. २२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात तो सहभागी होण्याची शक्यता आहे. जर त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले तर तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जवळजवळ नऊ वर्षांनंतर भारतीय संघात परतलेल्या करुण नायरला इंग्लंड मालिकेदरम्यान चार सामने खेळण्याची संधी देण्यात आली होती. तथापि, तो या मालिकेत फक्त एक अर्धशतक करू शकला होता. त्यानंतर त्याला संघातून डच्चू देण्यात होता. आता, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी त्याच्यासाठी स्वतःला सिद्ध करण्यासाठी नामी संधी असणार आहे. कारण हे टी-२० स्वरूप आयपीएल संघांचे लक्ष देखील आकर्षित करणार आहे.
हेही वाचा : कोलकाता खेळपट्टी वाद! गौतम गंभीर आणि ईडन गार्डन्स क्युरेटर पुन्हा भिडले? वाचा सविस्तर
मयंक अग्रवालला कर्नाटकची धुरा सोपवण्यात आली आहे. मागील हंगामात तो आरसीबीचा भाग होता, पण त्याला सोडण्यात आल्यानंतर, आता त्याच्याकडे चांगली कामगिरी करण्याची आणि आयपीएल लिलावात त्याचे मूल्य वाढवण्याची उत्तम संधी असणार आहे. सलामीवीर म्हणून, त्याच्यावर अनेक फ्रँचायझींचे लक्ष असणार आहे.
मयंक अग्रवाल (कर्णधार), मॅकनील नोरोन्हा, केएल श्रीजीत, करुण नायर, आर. स्मरन, अभिनव मनोहर, श्रेयस गोपाल, शिखर शेट्टी, वैशाख विजयकुमार, विद्वात कवेरप्पा, विद्याधर पाटील, श्रीवत्स आचार्य, शुभांगी हेगडे, प्रवीण दुबे, बीआर शरथ आणि देवदत्त पडिकल.






