Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे यंत्रणांना आदेश! २७ गावात क्लस्टर योजना राबवणार, पाण्याचाही दिलासा

वाढत्या लोकसंख्येला पुरेल इतके पाणी पुरवण्यासाठी अमृत योजनेचे स्वरूप अधिक विस्तारित करण्यासाठी अतिरिक्त २०० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी द्यावी अशी मागणी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. त्यावरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 17, 2024 | 10:17 AM
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे यंत्रणांना आदेश! २७ गावात क्लस्टर योजना राबवणार, पाण्याचाही दिलासा
Follow Us
Close
Follow Us:

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावांतील धोकादायक तसेच अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण करून त्यांच्यासाठी क्लस्टर योजना राबवावी. त्यासाठी आराखडा तयार करावा, यामुळे गावांचा विकास होण्यास गती मिळेल, अशा सूचना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांना केल्या आहेत. तसेच वाढत्या लोकसंख्येला पुरेल इतके पाणी पुरवण्यासाठी अमृत योजनेचे स्वरूप अधिक विस्तारित करण्यासाठी अतिरिक्त २०० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी द्यावी अशी मागणी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. त्यावरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेसह कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध विषयांवर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत पाणी प्रश्नासह विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अखत्यारीत मोठ्या प्रमाणात बांधकामे होत असून पाण्याची गरज देखील वाढू लागली आहे. यामुळे या शहरांना अतिरिक्त पाण्याची गरज आहे. त्यामुळे बारवी धरणातून किमान ८० ते ८५ एमएलडी अतिरिक्त पाणी देण्यात यावे. सूर्या धरणाचे काम पूर्णत्वास गेल्यानंतर त्यातून देखील काही अतिरिक्त पाणी साठा उपलब्ध करून देण्यात यावा. कुशिवली आणि काळू धरणाच्या उभारणीला गती देण्यात यावी. पोशिर धरणाचे काम देखील जलदगतीने पूर्णत्वास न्यावे. यामुळे केवळ कल्याण डोंबिवली महापालिकाच नव्हे तर अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर आणि आसपासच्या शहरांचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न कायमचा निकाली लागेल आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, अशी मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केली. तर पोशिर धरणाचे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात आल्यास अधिक गतीने होईल, अशा सूचना देखील यावेळी केल्या.

हेदेखील वाचा – विधानसभेपूर्वी केंद्राकडून महाराष्ट्राला मोठे गिफ्ट; 88 हजार कोटींच्या प्रकल्पांना मंजूरी

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावातील विविध प्रश्नांवरही चर्चा झाली. २७ गावातील जिल्हा परिषदेच्या शाळांचा महापालिकेत समावेश करून घेण्यात यावा. तर २७ गावातील धोकादायक तसेच अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नावरही तोडगा काढण्याची मागणी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. त्यावर बोलताना, या बांधकामांचे सर्वेक्षण करून त्यांच्यासाठी क्लस्टर योजना राबवावी त्यासाठी आराखडा तयार करावा. यामुळे गावांचा विकास होण्यास गती मिळेल, अशा सूचना यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तांना केल्या. तसेच कल्याण डोंबिवली पालिकेच्या परिवहन सेवेत १९९९ मध्ये भरती झालेले आणि २०१३ मध्ये कायमस्वरूपी कामावर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना मागील काही वर्षांचे थकीत वेतन देणे यावरही यावेळी सकारात्मक निर्णय घेण्यात आला. शेजारच्या उल्हासनगर महापालिकेटा स्थानिक संस्था कर अर्थात लोकल बॉडी टॅक्स भरण्यासाठी वाढीव मुदत देण्यात यावी, अशीही मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. यांसह अनेक महत्वाच्या विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी सर्व विषयांवर अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्व विषय विहित वेळेत मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन दिले. या बैठकीला कल्याण डोंबिवली येथील शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी तसेच राज्य शासनातील विविध विभागांचे उच्च पदस्थ अधिकारी उपस्थित होते.

पेंढारकर कॉलेजच्या समस्या

डोंबिवली येथील पेंढारकर कॉलेजमध्ये सध्या अनेक समस्या भेडसावत आहेत. कॉलेज सध्या अनुदानित असून येथील मॅनेजमेंट कॉलेज खासगी करण्याच्या मार्गावर आहे. कॉलेजचे खासगीकरण झाल्यास येथील विद्यार्थ्यांच्या फीमध्ये बेसुमार वाढ होईल. तसेच शिक्षकांच्या मानधनात देखील परिणाम होईल. यामुळे शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते. यामुळे कॉलेजवर शासनाच्या वतीने तातडीने प्रशासक नेमण्यात यावा. जेणेकरून कॉलेजच्या कारभारावर शासनाकडून देखरेख ठेवण्यात येईल. याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी सबंधित विभागाला सूचना केल्या.

राष्ट्रीय स्तरावरील नियोजक आणि मार्गदर्शक तत्वे ‘शहरी विकास योजना ‘तयार करणे आणि त्यावर मार्गदर्शक तत्वे तयार करून अंमलवजावणी करणे यामध्ये त्यांच्या मार्गदर्शक तत्वात कल्याण डोंबिवली महानगरपालीका आणि ठाणे महानगरपालिका या एकाच कॅटेगरीमध्ये येतात. त्यामुळे शहरे आणि विकास योजनेतील तरतुदी या मध्ये ठाणे प्रमाणेच कल्याण डोंबिवली शहराला देखील नियमावली लागू करण्यात यावी, अशी मागणी यावेळी एमसीएचआयने केली. असे केल्याने विकासकांना येणारे अडथळे दूर होणार आहे. यावर त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी केल्या.

Web Title: Chief minister eknath shindes order to the system cluster scheme will be implemented in 27 villages

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2024 | 10:09 AM

Topics:  

  • Cm Eknath Shinde
  • kalyan
  • MP Shrikant Shinde

संबंधित बातम्या

Kalyan : डोंबिवलीत भाजपा आणि ओम गणपती मित्र मंडळातर्फे भव्य दहीहंडी उत्सव
1

Kalyan : डोंबिवलीत भाजपा आणि ओम गणपती मित्र मंडळातर्फे भव्य दहीहंडी उत्सव

KDMC News: कल्याणकरांचा पाणी प्रश्न लवकरच सुटणार! उपमुख्यमंत्र्यांची घेतली भेट
2

KDMC News: कल्याणकरांचा पाणी प्रश्न लवकरच सुटणार! उपमुख्यमंत्र्यांची घेतली भेट

Kalyan Crime news: शिष्टाचार आणि वागणुकीचे मूलभूत येत नसल्याने चार वर्षीय मुलीची हत्या; त्यानंतर गादीत गुंडाळून…
3

Kalyan Crime news: शिष्टाचार आणि वागणुकीचे मूलभूत येत नसल्याने चार वर्षीय मुलीची हत्या; त्यानंतर गादीत गुंडाळून…

Ajit Pawar on Meat ban: १५ ऑगस्टला मांस विक्रीवर बंदी…! अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले श्रद्धेचा प्रश्न असल्यास..
4

Ajit Pawar on Meat ban: १५ ऑगस्टला मांस विक्रीवर बंदी…! अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले श्रद्धेचा प्रश्न असल्यास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.