Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विजेच्या धक्क्याने चिमुकल्याचा मृत्यू; घराच्या गच्चीवर खेळायला गेला अन्…

शहरात अनेक ठिकाणी वीजतारा या घरांवर दोन ते तीन फुटांपर्यंत आल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका असल्याचे माहीत असूनही महावितरणकडून कुठल्याही प्रकारची कारवाई किंवा दुरुस्तीचे काम केले जात नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 10, 2025 | 09:24 AM
कपडे वाळवताना लेकीला विजेचा धक्का; वाचवण्यासाठी गेलेल्या बापालाही झटका, जागीच झाला मृत्यू

कपडे वाळवताना लेकीला विजेचा धक्का; वाचवण्यासाठी गेलेल्या बापालाही झटका, जागीच झाला मृत्यू

Follow Us
Close
Follow Us:

नांदुरा : घराच्या गच्चीवर खेळायला गेलेल्या चिमुकल्याला वाकलेल्या वीजतारांचा जोरदार धक्का बसला. यातच त्या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.9) उघडकीस आली. अमित संतोष तायडे (रा. भीमनगर) असे मृताचे नाव आहे.

अमित सोमवारी सकाळी घराच्या गच्चीवर खेळायला होता. अशात त्याला विजेचा धक्का लागून तो जवळपास 80 टक्के भाजला. गंभीर अवस्थेत त्याला सुरुवातीला नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला अकोला येथे पुढील उपचारासाठी नेले असता त्याचा मृत्यू झाला. सध्याचा बेभरवशाचा निसर्ग, हवा, पाणी, वादळामुळे महावितरणच्या तारांची दयनीय अवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी वीजतारा लोंबकळताना दिसत आहे. विजेचे खांबसुद्धा वाकले आहेत. त्यामुळे तारांची उंची कमी झाली.

शहरात अनेक ठिकाणी वीजतारा या घरांवर दोन ते तीन फुटांपर्यंत आल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका असल्याचे माहीत असूनही महावितरणकडून कुठल्याही प्रकारची कारवाई किंवा दुरुस्तीचे काम केले जात नाही. नागरिकांनी तक्रार किंवा सूचना केल्यास त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. अशातच सोमवारी सकाळी अमित आपल्या मोठ्या बहिणीसोबत खेळायला गच्चीवर गेला असता त्याचा हात विजेच्या ताराला लागल्याने त्याचा भाजून मृत्यू झाला.

महावितरणच्या बेजबाबदारपणामुळे घडली घटना

दरम्यान, ही घटना महावितरणच्या बेजबाबदारपणामुळे घडली. त्यामुळे भीमनगरातील समाजसेवक व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन महावितरणच्या कार्यालयाला टाळे लावण्याचा इशारा दिला. तसेच शासन व प्रशासनाने नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. घटनास्थळाला तहसीलदार वट्टे, पोलिस निरीक्षक विलास पाटील व महावितरणचे सहाय्यक अभियंता जैस्वाल यांनी भेट दिली.

Web Title: Child dies due to electric shock incident in buldana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2025 | 09:24 AM

Topics:  

  • Buldana News
  • Electric Shock

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.