पीडितेचे सासरे गजानन धुंदाळे आणि सासू पुष्पा हे रात्री १ वाजता धाव घेत पोलिस-पाटील संदीप गटमणे यांच्या घरी आले व पवनने लक्ष्मीला कुऱ्हाडीने मारले अशी थरारक माहिती दिली.
आरोपी मुलगा विशाल डुकरे हा दारूच्या आहारी गेलेला होता. बुधवारी रात्री आई-वडिलांशी वाद घातला होता. यातूनच रागाच्या भरात रात्री अडीचच्या सुमारास त्याने वडील सुभाष व आई लता डुकरे यांच्यावर कुऱ्हाडीने…
पत्नीच्या दागिन्यांसंदर्भात तक्रारीवर बोरखेडी पोलिसांनी कारवाई न केल्याचा आरोप करण्यात आला. यावरूनच तारापूर येथील गोपाल चव्हाण या व्यक्तीने बुलढाणा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच आत्मदहनाचा प्रयत्न केला.
गावातीलच सय्यद मुस्ताक सय्यद इसा यांचा मुलगा पुणे येथे उच्च शिक्षण घेत आहे. त्याने अलीकडेच एनडीएची परीक्षा देण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, शाळेकडून चार महिन्यांपासून नावातील दुरुस्ती झाली नाही.
संतोष केदार या तरुण शेतकऱ्याने शुक्रवारी दुपारी साधारण दोन वाजेच्या सुमारास गावातील शेतात त्याने लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. हा प्रकार संतोषचा चुलत भाऊ गणेश शंकर केदार यांच्या निदर्शनास…
अपघात एवढा भीषण होता की, गिरी यांचा जागीच मृत्यू झाला. गिरी हे चिखली येथील तलाठी विनोद गिरी यांचे वडील असल्याने प्रशासन व स्थानिक नागरिकांमध्ये शोककळा पसरली.
ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना तातडीने शेगाव येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. या घटनेमधील आई व मुलगी दोघी अस्वस्थ असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
भरतला 10 लाख रुपये सावकारीवर दिले होते. मात्र, या पैशांच्या परतफेडीवरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. वादातूनच ज्ञानेश्वरने भरतच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केला.
शहरात अनेक ठिकाणी वीजतारा या घरांवर दोन ते तीन फुटांपर्यंत आल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका असल्याचे माहीत असूनही महावितरणकडून कुठल्याही प्रकारची कारवाई किंवा दुरुस्तीचे काम केले जात नाही.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून बुलढाणा जिल्ह्यातील शहर व ग्रामीण ब्लॉक अध्यक्षपदाच्या नियुक्त्यादेखील करण्यात आल्या आहेत.
लोखंडी सळई घेऊन जात असताना ट्रॅव्हल्सचालक विनोद सुधाकर पखाले (वय 40, रा. वर्धा) याला समोरून येणाऱ्या ट्रेलरचा अंदाज न आल्याने ट्रॅव्हल्स क्लिनर साईडला समोरून धडकली.
पीडित तरुणीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पीक पाणी आणि अन्य भाकीतांसाठी प्रसिद्ध असलेल्या भेंडवळनजीकच्या माऊली फाट्याजवळ रेतीने भरलेल्या टिप्परने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात आजी-आजोबांच्या डोळ्यादेखत घटनास्थळीच दोन्ही नातवंडाचा मृत्यू झाला.
दारू पिऊन पत्नीस मारहाण करायचा. शुक्रवारी (दि. 21) दुपारी दारू पिऊन आल्यानंतर पत्नी छायाला मारहाण करू लागला. आईला होत असलेली मारहाण सहन न झाल्याने मुलास राग अनावर झाला. त्याने डोक्यात…
पती पत्नीला दारू पिऊन मारहाण करत असल्याने पत्नी आपल्या माहेरी आईकडे पातुर्डा येथे राहण्यास गेली होती. दरम्यान, आरोपी जावई पांडुरंग श्रीकृष्ण अढाव हा 12 मार्च रोजी पत्नीला नेण्यासाठी तिच्या माहेरी…
शहरात वास्तव्यास असलेले महावितरण जळगाव जामोद येथील सहाय्यक अभियंता किशोर माणिकराव होणे यांना थकीत वीज बिलाची वसुली करत असताना जळगाव शहरातीलच कुरेशी मोहल्ल्यामध्ये शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली.
प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. हल्ला करणाऱ्यांमधील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. मयूर सिद्धपुरा असे आरोपीचे नाव आहे.