Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलांच्या तस्करीचा प्रयत्न उधळला; भुसावळ अन् मनमाड रेल्वे पोलिसांनी केली ५९ बालकांची सुटका

बिहार येथून सांगली आणि पिंपरी चिंचवड येथे मदरशात दाखल करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या २९ लहान मुलांना मनमाड आणि ३० मुलांना भुसावळ येथे रेल्वे पोलीस आणि आरपीएफ यांनी ताब्यात घेऊन त्यांची बालसुधार गृहात रवानगी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 01, 2023 | 01:14 PM
मुलांच्या तस्करीचा प्रयत्न उधळला; भुसावळ अन् मनमाड रेल्वे पोलिसांनी केली ५९ बालकांची सुटका
Follow Us
Close
Follow Us:

बिहार येथून सांगली आणि पिंपरी चिंचवड येथे मदरशात दाखल करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या २९ लहान मुलांना मनमाड आणि ३० मुलांना भुसावळ येथे रेल्वे पोलीस आणि आरपीएफ यांनी ताब्यात घेऊन त्यांची बालसुधार गृहात रवानगी केली आहे. एका प्रवाशाला संशय आल्यानंतर त्याने ट्वीट करून रेल्वे प्रशासनाला माहिती दिल्यावर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती रेल्वे पोलीस सूत्रांनी दिली असून याप्रकरणी मुलांसोबत असलेल्या चार शिक्षकांविरुद्ध कलम ४७० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधून महाराष्ट्रात रेल्वेने प्रवास करत दाखल झालेल्या २९ अल्पवयीन मुलांना मनमाडमध्ये तर ३० लहान मुलांना भुसावळ रेल्वे स्थानकावर सोडवण्यात आले. दानापूर-पुणे एक्सप्रेस रेल्वे गाडी नंबर 01040 यामध्ये लहान बालके असल्याची गोपनीय माहिती भुसावळ रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलीस भुसावळ यांना मिळाली होती.

त्यानुसार रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांनी संयुक्त कारवाई करत भुसावळ येथील एका सामाजिक संस्थेच्या सहकार्याने दाणापूर पुणे ही एक्सप्रेस भुसावळ स्टेशनवर आल्यानंतर त्याची कसून तपासणी करण्यात आली. यावेळी वेगवेगळ्या डब्यांमधून ८ ते १५ वयोगटातील ३० मुलांना रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने ताब्यात घेतले. या सर्व मुलांना रेल्वे स्थानकावर उतरवून त्यांच्यासोबत असणाऱ्या एका संशयिताला शिताफीने पकडून रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

त्यानंतर भुसावळ ते मनमाड दरम्यान एक्सप्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांकडून पुन्हा मनमाडपर्यंत प्रवासात रेल्वे गाडीत शोध मोहिम राबविण्यात आली. यावेळी रेल्वे गाडीत आणखी २९ मुले आणि ४ संशयित मिळून आले. यानंतर सर्वांना ताब्यात घेत मनमाड रेल्वे स्थानकावर उतरविण्यात आले. तसेच भुसावळ येथे मिळून आलेल्या ३० मुलांना जळगाव येथील बालसुधार गृहामध्ये काळजी घेण्यासाठी पाठवण्यात आले असून मनमाड येथील २९ मुलांना नाशिकच्या बालसुधार गृहामध्ये रवाना करण्यात आले आहे.

Web Title: Child smuggling attempt foiled bhusawal and manmad railway police rescued 59 children nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2023 | 01:14 PM

Topics:  

  • child trafficking
  • cmomaharashtra
  • devendra fadanvis

संबंधित बातम्या

Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ
1

Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ

नारायण राणेंनी वयाचं आणि केसावरील टोपाचं भान ठेवलं पाहिजे – Sanjay Raut
2

नारायण राणेंनी वयाचं आणि केसावरील टोपाचं भान ठेवलं पाहिजे – Sanjay Raut

Devendra Fadnavis : पडळकर-आव्हाडांच्या कार्यकर्त्यांचा विधिमंडळात राडा; फडणवीस संतापून म्हणाले, “सर्व आमदार माजलेत…”
3

Devendra Fadnavis : पडळकर-आव्हाडांच्या कार्यकर्त्यांचा विधिमंडळात राडा; फडणवीस संतापून म्हणाले, “सर्व आमदार माजलेत…”

“त्यांना असली शिवसेना पाहिजे की डुप्लिकेट? फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर संजय राऊत स्पष्टच बोलले
4

“त्यांना असली शिवसेना पाहिजे की डुप्लिकेट? फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर संजय राऊत स्पष्टच बोलले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.