
Chilli truck overturned while avoiding potholes, incident on Vadki flyover
यवतमाळ : हैद्राबाद (Hyderabad) वरून नागपूरला (Nagpur) मिरचीने भरून निघालेला ट्रक खड्डा चुकविण्याच्या नादात पलटी झाला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मात्र ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना रविवारी ७ ऑगष्ट रोजी वडकी (Vadaki) येथील उड्डाणपुलावर घडली.
हैदर अली (रा हरियाणा) व किनर फारुख शेख (रा. हरियाणा) हे दोघेह चालक वाहनक सुरक्षित असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. प्राप्त माहितीनुसार मिरचीने भरलेला ट्रक क्र. ए,पी ०७ टीए ०६६६ हा हैद्राबादवरून वडकी मार्गे नागपूरला निघाला होता. वडकी येथील उड्डाणपुलावरती आल्यावर खड्डे चुकविण्याच्या नादात हा अपघात होऊन थेट दुभाजकावर पलटी झाला. सुदैवाने तो ट्रक पुलावरून खाली कोसळला नाही अन्यथा मोठी दुर्घटना घडून अनेकांचे प्राण गेले असते. घटनेनंतर घटनास्थळी वडकी पोलीस स्टेशनचे (Vadki Police Station) ठाणेदार विनायक जाधव व पोलीस किरण दासरवार यांनी जाऊन पाहणी केली तसेच मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत केला.
प्रशासानाच्या ढिसाळ काराभारामुळे या मार्गावर असलेले लहान मोठे खड्डे प्रवाशांच्या जीवावर बेतू लागले आहे. अपघात होऊन देखील रस्त्याच्या बाबतीत प्रशासन कोणत्याही प्रकारची दखल घेत नसल्याचे चित्र आहे. या रोडवर ट्रक पलटी झाल्याच्या घटना ही नित्याचीच बाब झाली आहे. वडकी उड्डाणपुलावरती या वळणार प्रकाश दिव्याची सोय नसल्याने रात्रीच्या अंधारात नवीन व लांब पल्ल्यावरून येणारी छोटी-मोठी वाहने थेट खड्डा चुकविण्याच्या नादात अपघात होत आहे. मात्र संबंधित प्रशासन जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसत आहे.