सणावाराच्या दिवसांमध्ये साखरेच्या दरात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना महागाईचा फटका बसला आहे. उत्सवांच्या गोडव्याला महागाईची कडू झळ लागली आहे. किरकोळ बाजारात साखरेचे दर ७० ते ७५ रुपये प्रति किलो तर…
महात्मा फुले चौकासह शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांविरोधात नियमित कारवाई करण्याची गरज आहे.एखादी कारवाई केल्यानंतर काही दिवसांत पुन्हा त्याच ठिकाणी दुकाने थाटली गेल्यास वाहतूक कोंडीची समस्या…
समृद्धी महामार्गावरील वाहतूक सुरळीत आणि अपघातमुक्त ठेवण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार नियमित तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. तपासणीदरम्यान चुकीच्या पद्धतीने पार्क केलेली वाहने आढळल्यास ती तात्काळ सुरक्षितस्थळी हलविण्याच्या सूचना देण्यात येत आहेत.
दरवर्षी पावसाळ्यात दूध उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे काही प्रमाणात दुधाची टंचाई जाणवते. सध्या एफडीएकडून धाडसत्र सुरू असल्याने भेसळखोरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. परिणामी दूध उत्पादनात पाच ते सात टक्क्यांची घट…
राज्यभरात सगळीकडे मुसळधार पाऊस पडत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागातील संपर्क मार्गावरील पूल खचल्याने जिल्ह्यात तब्बल ३० पेक्षा जास्त ग्रामीण मार्गांवर एसटी बसफेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत.
राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी ५ ते १५ जून या कालावधीत राज्यव्यापी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश महामंडळाच्या मुख्य सुरक्षा व दक्षता विभागाने दिले…
जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी प्लास्टिक मल्चिंग आणि जैविक मल्चिंग करणे आवश्यक आहे. पिकाची कोळपणी करून पिकाच्या बुच्याशी मातीची भर द्यावी जेणेकरून ओलावा टिकून राहील. कापूस, तूर, मका, सूर्यफूल पिकांचे रोपे दाट…
पूर्वी महिला प्रवासी आधारकार्ड किंवा इतर ओळखपत्र दाखवून अर्ध्या दरात प्रवास करत होत्या, तर ज्येष्ठ नागरिकांना पूर्ण सवलत मिळत होती. मात्र नव्या नियमांनुसार बसमध्ये इलेक्ट्रॉनिक पडताळणीद्वारेच सवलत लागू होणार आहे.
वाद वाढत जाऊन पतीने पत्नीला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या पत्नीने विषप्राशन केले. घटनेनंतर तिला तातडीने आर्णी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आखाती देशांतील तणावाचे पडसाद आता थेट ग्रामीण अर्थव्यवस्थेवर उमटू लागले. इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे जागतिक बाजारपेठेत निर्माण झालेल्या अस्थिरतेचा परिणाम विदर्भातील शेतीमालाच्या दरांवर होत आहे.
पुसद तालुक्यातील आरेगाव मोहा येथील ज्योतिबाराव दतराव राऊत, महागाव तालुक्यातील कातरवाडी येथील शैलेश नामदेव राठोड व आत्माराम नंदू पवार या शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
ग्रामीण भागापासून शहरापर्यंत आरोग्यसेवेचे जाळे विणण्यात आले आहे. मात्र, शासकीय आरोग्य संस्थेत डॉक्टर नियमित उपस्थित राहत नाही. आरोग्य तपासणी झाल्यास औषधी मिळत नाही.
यवतमाळ शहरात या पाण्याच्या व्यापारातून वर्षभरात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. मात्र पाण्याच्या गुणवत्तेवर प्रशासनाचे लक्षच नसल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
किरण पुरंदरे यांनी टिपलेल्या या छायाचित्रात पक्ष्याचे सौंदर्य अधिकच उठावदार दिसत आहे. पक्ष्याच्या डोक्यावर, पाठीवर, पंखांवर आणि शेपटीवर दवबिंदू किंवा पावसाचे जणू काही मोतीच जमा झाले आहेत, असे चित्र या…
सेवा सहकारी संस्थांमार्फत वितरित करण्यात आलेल्या कर्जाच्या थकीत खात्याविषयी माहिती संकलनाचे काम युद्धस्तरावर करण्यात आले आहे. मात्र, ग्रामीण भागात अनेक शेतकरी आवश्यक कागदपत्रे देण्यास उदासीन असल्याचे दिसून आले.
गेल्या काही वर्षात मुलींचा जन्मदर घटला आहे. त्यामुळे लग्नासाठी मुली मिळणे कठीण होत चालले आहे. त्यातच मुली उच्च शिक्षित झाल्या असून, त्या लग्नासाठी आपल्या 'बरोबरी'चाच मुलगा पसंत करत आहेत.
सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, वाहनाचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच दिग्रसचे ठाणेदार वैजनाथ मुंडे यांनी तातडीने पथकासह घटनास्थळ गाठले.
यवतमाळ शहरात २० पेक्षा जास्त गाठीचे कारखाने असतात. यावर्षी केवळ पाच गाठींचे कारखाने तयार झाले आहेत. या ठिकाणी गाठी तयार करण्यासाठी थेट उत्तर प्रदेशातील कारागीर येतात.
अकोल्यात जेमतेम पक्षी अकोला वा जिल्ह्यात पोपटखेड, काटेपूर्णा, दगडपारवा, कापशी, सिसा-मासा-उदेगाव, विझोरा, दुधाळा, आगर, आखतवाडा आदी जलाशयांवर दरवर्षी स्थलांतरी पक्षी हजेरी लावतात.
वाचनालयाच्या तिजोरीत सापडलेल्या या सोन्याच्या नाण्याच्या एका बाजूला 'श्री राजा शिव' अशी अक्षरे कोरलेली असून दुसऱ्या बाजूला 'छत्रपति' असा मजकूर आहे. १६७४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी चलन चलनात आले.