Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pandharpur Wari : माऊलींच्या पालखीत चोपदाराची वारकरी महिलेला धक्काबुक्की; VIDEO व्हायरल

पंढरपूर वारीच्या भक्तिमय वातावरणात, लाखो विठ्ठलभक्तांचा नवा उत्साह ओसंडून वाहत असताना एका धक्कादायक प्रकाराने याला गालबोट लावलं आहे. ही घटना सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jul 03, 2025 | 05:04 PM
माऊलींच्या पालखीत चोपदाराची वारकरी महिलेला धक्काबुक्की; VIDEO व्हायरल

माऊलींच्या पालखीत चोपदाराची वारकरी महिलेला धक्काबुक्की; VIDEO व्हायरल

Follow Us
Close
Follow Us:

पंढरपूर वारीच्या भक्तिमय वातावरणात, लाखो विठ्ठलभक्तांचा नवा उत्साह ओसंडून वाहत असताना एका धक्कादायक प्रकाराने याला गालबोट लावलं आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात रिंगणादरम्यान घडलेली ही घटना सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका चोपदाराने महिला वारकऱ्याशी उद्धट वागणूक केल्याचं स्पष्टपणे दिसत आहे.

Trupti Desai : दारू पितो, दहशत माजवतो, अन् महिलांना; तृप्ती देसाईंचे भाजप नेत्यांवर गंभीर आरोप, पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी

घटना 3 जुलै रोजी सकाळी वेळापूरहून प्रस्थान केलेल्या माऊलींच्या पालखीच्या रिंगण सोहळ्यातील आहे. उघडेवाडी येथे पालखीचे उभे रिंगण पार पडले. यानंतर डोक्यावर तुळस घेऊन काही महिला वारकरी भक्तिभावाने प्रदक्षिणा घालत होत्या. त्याचवेळी पालखीतील मुख्य चोपदार पुढे येऊन अचानक एका महिला वारकऱ्याला ढकलून देतो. त्यामुळे ती महिला थेट समोर बसलेल्या दुसऱ्या वारकऱ्यांवर पडते. विशेष म्हणजे, तिच्या डोक्यावरची पितळेची तुळस कोणावर पडली असती तर मोठा अपघात घडला असता.

या प्रकारानंतरही संबंधित चोपदार महाशय थांबले नाहीत. त्यांनी त्या महिलेशी उद्धटपणे बोलणे सुरूच ठेवले. ‘वारी म्हणजे सेवा, शिस्त आणि प्रेम’ असा वारकऱ्यांचा स्थायीभाव असताना अशा प्रकारचे वर्तनामुळे संताप व्यक्त होत आहे.

नेटीझन्सनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला असून, संत ज्ञानेश्वर माऊलींना ‘आई’ मानणाऱ्या भक्तांच्या पालखीत महिलांशी अशा प्रकारची वर्तणूक योग्य आहे का? असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात आहे. वारीचा मूळ गाभा म्हणजे भक्तिभाव, समता, प्रेम आणि सहिष्णुता. मात्र असा प्रकारांमुळे या मूल्यांना कुठेतरी धक्का पोहोचत असतो.

Manisha Kayande : ‘पंढरीच्या वारीत अर्बन नक्षली’; मनिषा कायंदेंचा सभागृहात गंभीर आरोप

वारीचे व्यवस्थापन अत्यंत काटेकोर असते, मात्र अशा घटनांनी व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. संबंधित चोपदारावर कारवाई होणार का, याकडे आता सर्व वारकऱ्यांचे लक्ष लागले आहे. वारीतील ही घटना केवळ एका व्यक्तीच्या चुकीमुळे संपूर्ण वारीच्या सन्मानाला धक्का लावणारी असून, अशा प्रकारच्या वर्तनाला पाठीशी घालणं चुकीचं असल्याचं म्हटलं जात आहे. या घटनेनंतर वारी व्यवस्थापनाने अशा प्रकारच्या उद्धट वर्तनावर नियंत्रण ठेवणं आवश्यक असल्याची मागणी होत आहे.

Web Title: Chopdar rude behavior with warkari woman in ringan pandharpur wari latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2025 | 05:01 PM

Topics:  

  • Ashadhi Wari
  • Pandharpur News
  • pandharpur wari

संबंधित बातम्या

Sugarcane Bill : प्रतिटनामागे 15 रुपयांची कपात; सरकारच्या निर्णयावरुन शेतकऱ्यांत संतप्त पडसाद
1

Sugarcane Bill : प्रतिटनामागे 15 रुपयांची कपात; सरकारच्या निर्णयावरुन शेतकऱ्यांत संतप्त पडसाद

पंढरपूरमध्ये रेशनचा काळाबाजार, पुरवठा विभागाकडून कारवाईसाठी टाळाटाळ; शिंदेंच्या शिवसेनेचा आरोप
2

पंढरपूरमध्ये रेशनचा काळाबाजार, पुरवठा विभागाकडून कारवाईसाठी टाळाटाळ; शिंदेंच्या शिवसेनेचा आरोप

कासेगाव परिसरात पुन्हा मुसळधार पावसाचे थैमान; शेतकऱ्यांवर आस्मानी संकट, शेताला तळ्याचे स्वरुप
3

कासेगाव परिसरात पुन्हा मुसळधार पावसाचे थैमान; शेतकऱ्यांवर आस्मानी संकट, शेताला तळ्याचे स्वरुप

Pandharpur : नुकसानग्रस्तांसाठी मनसेचा मदतीचा हात
4

Pandharpur : नुकसानग्रस्तांसाठी मनसेचा मदतीचा हात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.