Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिलासादायक! यंदा पाणीटंचाईपासून नागरिकांची होणार सुटका ; राज्यातील धरणांमध्ये पुरेशा प्रमाणात जलसाठा

न्हाळा सुरू होऊनही राज्यातील धरणांमध्ये सध्या स्थितीमध्ये 67 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदा पाण्याचा तुटवडा जाणवणार नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 19, 2022 | 10:17 AM
दिलासादायक! यंदा पाणीटंचाईपासून नागरिकांची होणार सुटका ; राज्यातील धरणांमध्ये पुरेशा प्रमाणात जलसाठा
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : मार्च महिना सुरुवातीलाच राज्यात कड्याक्याचं उन पडायला सुरुवात झाली आहे. उन्हाळा म्हटलं की अनेकदा पाणीटंचाईचा प्रश्न समोर येतो. मात्र या वर्षी नागरिकांना पाण्याची चिंता करण्याची काही गरज नाही आहे. कारण राज्यातील धरणांमध्ये सध्या स्थितीमध्ये 67 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदा पाण्याचा तुटवडा जाणवणार नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

राज्यातील काही भागात पाणीटंचाईचा प्रश्न भीषण आहे. उन्हाळा सुरू होताच ग्रामीण भागातील महिलांना डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी भटकंती करावी लागते. मात्र यंदा हे चित्र काहीसं बदलल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षी राज्यात चांगला पाऊस झाला. परिणामी यंदा राज्यातील सर्वच विभागत पुरेशा प्रमाणात जलसाठा उपलब्ध आहे, त्यामुळे यंदा पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाहीये. उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाळा सुरू होऊनही राज्यातील धरणांमध्ये सध्या स्थितीमध्ये 67 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदा पाण्याचा तुटवडा जाणवणार नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यंदा धरणात गेल्या वरर्षीच्या तुलनेत आठ टक्के जलसाठा अधिक आहे. तसेच यंदा राज्यातील सर्वच विभागात चांगला पाऊस झाल्याने ग्रामीण भागात देखील जलसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. पावसामुळे विहीरी तुडुंब भरल्यामुळे यंदा राज्यात पाणीटंचाई जाणवणार नाही.

कोणत्या विभागात किती टक्के पाणीसाठा?

प्राप्त आकडेवारीनुसार सद्यास्थितीमध्ये औरंगाबाद विभागातील धरणांमध्ये 70 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर अमरावती विभागातील धरणांमध्ये 63 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. नागपूर विभाग 53, पुणे विभाग 72 आणि नाशिक विभागात 61 टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. राज्यातील धरणांमध्ये यंदा पुरेशा प्रमाणात जलसाठा शिल्लक असल्यामुळे पाणीटचांई जाणवणार नसल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. मराठवाडा आणि विदर्भात कायमच दुष्काळी परिस्थिती असते. उन्ह्याळ्यात पाणीटंचाईच्या तीव्र झळा येथील नागरिकांना बसतात. मात्र यंदा हे चित्र बदलले आहे. मराठवाड्यातील धरणामध्ये तब्बल सत्तर टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

लघू व मध्यम धरण, तलावातही पुरेसा जलसाठा

राज्यातील सर्वच विभागात चांगला पाऊस पडला त्यामुळे मोठ्या धरणांसोबतच लघू व मध्यम धरणात देखील पुरेसा जलसाठा उपलब्ध आहे. ग्रामीण भागाला व अनेक छोट्या शहरांना तलावातून पाणीपुरवठा करण्यात येतो, यावर्षी तलावात देखील पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. पाऊस चांगला झाल्याने ग्रामीण भागातील विहिरी आजही तुडुंब भरलेल्या असून, ग्रामीण भागातील महिलांची पाण्यासाठी करावी लागणारी पायपीट वाचली आहे. सोबतच पावसामुळे रब्बी हंगाम देखील जोरात आहे.

Web Title: Citizens will be relieved from water scarcity this year adequate water storage in dams in the state nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2022 | 10:17 AM

Topics:  

  • Water scarcity

संबंधित बातम्या

पंजाब आणि हरयाणामध्ये पेटले पाणीयुद्ध! पाण्याचा एकही थेंब न देण्याचा भगवंत मान यांचा निर्णय
1

पंजाब आणि हरयाणामध्ये पेटले पाणीयुद्ध! पाण्याचा एकही थेंब न देण्याचा भगवंत मान यांचा निर्णय

Water scarcity : तापमान वाढीमुळे भूजल पातळीत मोठी घट; तलाव विहिरींची पाणीपातळी खालावली
2

Water scarcity : तापमान वाढीमुळे भूजल पातळीत मोठी घट; तलाव विहिरींची पाणीपातळी खालावली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.