Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सीबीआयकडून क्लीन चिट; खंडणीप्रकरणी तपास बंद

Mumbai Police : भूखंड बळकावण्यासाठी धमकावणे आणि दोन कोटींची खंडणी वसूल केल्याप्रकरणी मुंबईतील व्यापाऱ्याने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर आरोप केला होता. 

  • By युवराज भगत
Updated On: Jan 31, 2024 | 07:35 PM
Clean chit to Param Bir Singh by CBI, investigation in extortion case closed

Clean chit to Param Bir Singh by CBI, investigation in extortion case closed

Follow Us
Follow Us:
मुंबई : माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांना देखील सीबीआयकडून (CBI) क्लीन चीट मिळाली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करुन खळबळ माजवून देणारे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह इतरांविरुद्ध धमकावून खंडणी मागितल्याप्रकरणी ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्याचा तपास आता बंद करण्याचा अहवाल केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.
खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल केला होता
आपल्या मालकीचा भूखंड बळकावण्यासाठी धमकावणे आणि दोन कोटींची खंडणी वसूल केल्याप्रकरणी व्यावसायिक शरद अग्रवाल यांनी परमबीर सिंग आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. सिंग यांच्या व्यतिरिक्त उपायुक्त पराग मणेरे, संजय पुनमिया, सुनील जैन, मनोज घोटकर यांच्याविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात धमकावणे आणि खंडणीप्रकरणी जुलै 2021 मध्ये गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात पुनमिया आणि जैन यांना अटक झाली होती. मात्र सिंग यांच्यासह इतरांना अटक करण्यात आली नव्हती.
पाचही एफआयआर सीबीआयकडे वर्ग
मात्र 24 मार्च 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल देते वेळी सिंग यांच्या विरोधातील पाचही एफआयआर सीबीआयकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते. तसेच त्यांना अटकेपासून संरक्षण देखील दिले होते. या प्रकरणी सीबीआयने ठाण्याच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करुन तपास बंद करण्याची परवानगी मागितली आहे.
सीबीआयने कोर्टात काय म्हटले?
2016-17 साली घडलेला हा गुन्हा सिद्ध करण्यासाठी आवश्यक ते पुरावे उपलब्ध झालेले नाहीत वा आक्षेपार्ह काहीही आढळलेले नाही, असे सीबीआय ने सांगितले. अग्रवाल हे आर्थिक व्यवहारात प्रामाणिक नाहीत आणि खोट्या दिवाणी आणि फौजदारी खटल्यात व्यक्तींना अडकविण्याचा त्यांचा इतिहास असल्याची बाबही सीबीआयने उघड केली. अग्रवाल आणि बिल्डर संजय पुनमिया यांच्यात झालेला समझोता कोणत्याही दबावाशिवाय किंवा जबरदस्तीशिवाय झाल्याचे सीबीआयला तपासात आढळून आल्याचे सीबीआयने कोर्टात सांगितले आहे.
इतर चार गुन्ह्यांचा तपास अजून सुरू
परमबीर सिंग यांच्याविरोधात मुंबईतील मरिन ड्राइव्ह, गोरेगाव, अकोला आणि ठाणे येथील ठाणेनगर या पोलिस ठाण्यांमध्ये असे एकूण पाच वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी कोपरी इथे दाखल झालेल्या गुन्ह्यात सीबीआयने हा तपास बंद करण्याचा अहवाल सादर केला आहे. मात्र इतर चार गुन्ह्यांचा तपास अजून सुरू आहे.
काय होती तक्रार?
शरद अग्रवाल याचे काका श्यामसुंदर व पुतण्या शुभम यांना नोव्हेंबर 2016 मध्ये अटक झाली. त्यावेळी मनोज घोटकर यांच्यासोबत तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या घरी मदत मागण्यासाठी शरद गेले. तेथे संजय पुनमिया यांच्या सांगण्यावरून परमबीर सिंग, उपायुक्त पराग मणेरे यांनी पुनमिया यांच्याशी समझोता करून घेण्याची धमकी दिली. तसेच पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास अग्रवाल यांना ‘मोक्का’ लावण्याची धमकी दिली. सिंग यांच्या निर्देशावरूनच अग्रवाल याला अटक झाली. एक कोटी रुपये दिल्यानंतर सोडू अशी मागणी केल्याचा असा आरोप होता.
सीबीआयकडून तपास बंद करण्याचा अहवाल
यासंदर्भात गेले काही महिने सीबीआय तपास करत होती. मात्र 18 जानेवारी रोजी पाण्याच्या मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर सीबीआयने तपास बंद करण्याचा अहवाल सादर केला. याच्या विरोधात तक्रारदारांनी ठाणे सेशन कोर्टात अपील केले आहे. त्याची सुनावणी 12 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या सुनावणी मध्ये आणि परमवीर सिंग यांच्या विरोधात असलेल्या इतर गुन्ह्यांमध्ये काय तपास लागतो यावर परमवीर सिंग यांचे भवितव्य अवलंबून आहे.

Web Title: Clean chit to param bir singh by cbi investigation in extortion case closed nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2024 | 07:35 PM

Topics:  

  • Former Mumbai Police Commissioner

संबंधित बातम्या

Maharashtra ATS News : ‘जैश-ए-मोहम्मदशी’ संबंध असल्याच्या आरोपावरून महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई
1

Maharashtra ATS News : ‘जैश-ए-मोहम्मदशी’ संबंध असल्याच्या आरोपावरून महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.