
फोटो सौजन्य सोशल मिडिया
एटीएसच्या कारवाईमध्ये ‘रॅपिडो’ रायडर आणि अत्तर विक्रेता म्हणून काम करत होता. हे काम करत असताना तो एक कट्टरपंथी विचारधारा पसरवत होता. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून जातीय द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या मोबाईल फोनमध्ये देशविरोधी साहित्यही देखील सापडले आहेत. तो एक टेलिग्राम ग्रुप चालवत होता, ज्याद्वारे त्याने 1 जून 2026 रोजी मौलाना मसूद अझरची प्रक्षोभक भाषणे त्यांने प्रसारीत केली होती. त्याच बरोबर तो पाकिस्तान-समर्थित ‘इब्न-ए-कासिम’ चॅनेलवरही सक्रिय होता, अशी माहिती महाराष्ट्र एटीएस कडून मिळाली आहे.
माहीम येथून मोहम्मद हसन अबू सरमद अख्तर (33 वर्षे ) याला माहीम मेट्रो स्टेशनजवळ असलेल्या लक्ष्मी बिल्डिंग येथून अटक करण्यात आली. आरोपीच्या मोबाईल मध्ये मसूद अझर याची कॅाल रेकॅार्ड आणि भाषणे आढळ्याने त्याच्यावर एटीएस द्वारे कारवाई करण्यात येत आहे. मिळालेल्या माहिती नुसार आरोपी मोहम्मद हसन अबू सरमद अख्तर हा मूळचा बिहारचा असून तो गेली 10 वर्षे मुंबईत राहतो आहे. माहीम परिसरातील ‘बाबा फालुदा’ जवळ अत्तर विकण्याचे काम करायचा आणि सोबतच रॅपिडो बाईक टॅक्सी कंपनीसाठी काम करत होता.
Rapido पुण्यात मोठा झटका! बाइक टॅक्सी सेवा बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश नेमकं कारण काय?
मुंबई एटीएसच्या काळाचौकी युनिटने आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 196(1) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून हे कलम धर्म किंवा भाषा यांसारख्या कारणांवरून विविध गटांमध्ये शत्रुत्वाला प्रोत्साहन देते. तसेच सामाजिक सलोखा बिघडवण्याशी संबंधित प्रकरणांशी संबंधित आहेत. शुक्रवारी न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. एटीएस सध्या त्याच्या मोबाईल फोनची, सोशल मीडियावरील हालचालींची आणि टेलिग्राम ग्रुपमधील त्याच्या सहभागाची चौकशी सुरू आहे.
मसूद अझरचे नाव भारतातील अनेक दहशतवादी प्रकरणांशी जोडलेले आहे. ‘जैश’चा प्रमुख मसूद अझर याला १९९४ मध्ये जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे अटक करण्यात आली होती. डिसेंबर १९९९ मध्ये, काठमांडूहून दिल्लीला जाणारे इंडियन एअरलाईन्सचे विमान (IC-814) हायजॅक करून अफगाणिस्तानमधील कंधारला नेण्यात आले होते.
आधी महिलेवर गोळी झाडली, पोलिस मागावर असतानाच आरोपीने स्वतःला संपवले; अहिल्यानगरमधील घटनेनं खळबळ
Ans: मोहम्मद हसन अबू सरमद अख्तर (वय ३३) याला मुंबईतील माहीम परिसरातून अटक केली .
Ans: माहीम मेट्रो स्टेशनजवळील लक्ष्मी बिल्डिंग परिसरातून
Ans: जैश-ए-मोहम्मदशी कथित संबंध, सोशल मीडियावर प्रक्षोभक साहित्य प्रसारित करणे आणि विविध गटांमध्ये शत्रुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप आहे.