Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोंगरीतील निरीक्षण गृह व बालगृहात ‘कपडे दान कक्ष’; अनोख्या उपक्रमातून महिला व बालविकास विभागाचे जनतेला आवाहन

डोंगरी येथील निरीक्षण गृह व बालगृहात अनेक अल्पवयीन मुलांचे वास्तव्य असते. अशा मुलांना सामाजिक, आर्थिक, मानसिक आधार देण्याची गरज असून याच भावनेतून म्हणून राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या संकल्पनेतून प्रधान सचिव श्रीमती आय ए कुंदन यांच्या मार्गदर्शनाखाली डोंगरीतील निरीक्षण गृह व बालगृहात ‘कपडे दान कक्ष’ उभारण्यात आला आहे.

  • By Vivek Bhor
Updated On: Mar 11, 2022 | 08:37 PM
डोंगरीतील निरीक्षण गृह व बालगृहात ‘कपडे दान कक्ष’; अनोख्या उपक्रमातून महिला व बालविकास विभागाचे जनतेला आवाहन
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : डोंगरी येथील निरीक्षण गृह व बालगृहात राहणाऱ्या मुलांसाठी कपडे उपलब्ध व्हावेत या उद्देशाने राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने एक अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामाध्यमातून याठिकाणी कपडे दान कक्षाची स्थापना केली असून या कक्षात जनतेने कपडे दान करून सहकार्य करावे असे आवाहन महिला व बालविकास विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

डोंगरी येथील निरीक्षण गृह व बालगृहात अनेक अल्पवयीन मुलांचे वास्तव्य असते. अशा मुलांना सामाजिक, आर्थिक, मानसिक आधार देण्याची गरज असून याच भावनेतून म्हणून राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या संकल्पनेतून प्रधान सचिव श्रीमती आय ए कुंदन यांच्या मार्गदर्शनाखाली डोंगरीतील निरीक्षण गृह व बालगृहात ‘कपडे दान कक्ष’ उभारण्यात आला आहे. जेणे करून संस्थेतील ‘कपडे दान कक्षात’ जाऊन जनतेने आपल्यासोबत आणलेले स्वच्छ व नीटनेटके कपडे याठिकाणी ठेवावेत. त्यानंतर या कक्षातील आपल्या आवडीनुसार आणि आकारानुसारचे कपडे मुले स्वत: निवडतील आणि परिधान करू शकतील. शक्यतो जनतेने नवीन कपड्यांना प्राधान्य द्यावे अशी ही विनंती करण्यात आली आहे.

राज्याचा महिला व बाल विकास विभाग हा बालक जीवन, सुरक्षा, विकास सक्षमीकरण आणि सहभाग समग्रपणे व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. डोंगरी येथील निरीक्षण गृह व बालगृहात राहणाऱ्या मुलांना चांगल्या सुविधांसह चांगले कपडे परिधान करता यावेत म्हणून या मुलांसाठी स्वच्छ आणि नीट नेटके कपडे जनतेने दान करून त्यांच्यासाठी आधारवड बनावे ही यामागची भावना आहे.

Web Title: Clothing donation room in the observation house and kindergarten in the dongri appeal to the people of women and child development department through a unique initiative nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2022 | 08:37 PM

Topics:  

  • Room

संबंधित बातम्या

हॉटेल रूम्समधून फुकटात घेऊन जाऊ शकतो या’ 5 गोष्टी; ना कोणी अडवेल, ना द्यावा लागेल एक्स्ट्रा चार्ज
1

हॉटेल रूम्समधून फुकटात घेऊन जाऊ शकतो या’ 5 गोष्टी; ना कोणी अडवेल, ना द्यावा लागेल एक्स्ट्रा चार्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.