Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आमदार अतुल भोसलेंच्या प्रयत्नांना यश; आरक्षित जागेच्या बाबतीत मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

पाटण कॉलनीतील झोपडपट्टीवासीयांच्या घरांचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली असून, या लोकांना याच जागेवर घरे मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 20, 2024 | 04:36 PM
आमदार अतुल भोसलेंच्या प्रयत्नांना यश; आरक्षित जागेच्या बाबतीत मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले 'हे' महत्वाचे आदेश

आमदार अतुल भोसलेंच्या प्रयत्नांना यश; आरक्षित जागेच्या बाबतीत मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले 'हे' महत्वाचे आदेश

Follow Us
Close
Follow Us:

कराड: शहरातील पाटण कॉलनीतील झोपडपट्टीवासीयांच्या घरांचा प्रश्न मार्गी लागण्याबाबत आज एक आश्वासक पाऊल उचलले गेले आहे. पाटण कॉलनीतील आरक्षित जागेवरील पार्किंग’ हा उल्लेख काढून, तिथे ‘बेघरांसाठी घरे’ असा बदल करण्याची मागणी कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान केली.

या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत तत्काळ प्रस्ताव तयार करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे या लोकांना याच जागेवर घरे मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कराड शहरातील पाटण कॉलनीत गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ अनेक लोकांना झोपडपट्टीत राहावे लागत आहे. या झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावून, त्यांना हक्काची घरे मिळवून देण्यास आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी प्राधान्य दिले आहे. यादृष्टीने त्यांनी गेल्या आठवड्यात नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत या परिसराची पाहणी केली होती. तसेच झोपडपट्टी पुनर्वसनाबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे निर्देश नगरपालिका प्रशासनाला दिले होते.

पाटण कॉलनीत ज्या जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून झोपडपट्टीवासीय राहत आहेत, त्या जागेची मालकी कराड नगरपरिषदेकडे आहे. या जागेचे ‘खुली जागा’ असे नामाभिदान बदलून, ‘पार्किंग’ करण्याचा फेरबदल महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने ४ एप्रिल २०१२ साली केला.

नगरविकास विभागास प्रसाव सादर

वास्तविक, या जागेवर दीर्घकाळापासून झोपडपट्टीवासीय राहत आहेत. त्यामुळे कराड शहराला झोपडपट्टीमुक्त करण्याचा दृष्टीकोन विचारात घेऊन, या जागेचे ‘पार्किंग’ आरक्षण बदलून, ‘बेघरांसाठी घरे’ असे आरक्षण करणे शहराच्या विकासाच्या दृष्टीने संयुक्तिक आहे. याबाबतचा प्रस्ताव आमदार डॉ. अतुल भोसले यांनी दिलेल्या निर्देशानुसार, कराड नगरपालिकेने राज्याच्या नगरविकास विभागास सादर केला आहे. याबद्दल प्रशासकीय पातळीवर तत्काळ कार्यवाही व्हावी, अशा मागणीचे पत्र आमदार डॉ. भोसले यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री ना. फडणवीस यांना दिले.

प्रस्ताव तयार करण्याचे आदेश 

आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या या मागणीची दखल घेत, मुख्यमंत्र्यांनी याबाबत तत्काळ प्रस्ताव तयार करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. त्यामुळे पाटण कॉलनीतील झोपडपट्टीवासीयांच्या घरांचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली असून, या लोकांना याच जागेवर घरे मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

एक-दोन नव्हे तर तब्बल ५० वर्षांहून अधिक काळ हा विषय प्रलंबित आहे. या प्रश्नाचा पाठपुरावा करीत असताना आज मोठे यश मिळाले आहे. कराड दक्षिणमधील पाटण कॉलनी, शनिवार पेठ येथील (आरक्षण क्र. ४८) या जागेस ‘पार्किंग’ असा नामोल्लेख होता. तो बदलून ‘बेघरांसाठी घरे’ असा व्हावा, याकरिता केलेल्या पाठपुराव्यास यश आले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. त्यामुळे झोपडपट्टीवासियांच्या हक्काच्या घरासाठीचा प्रश्न मार्गी लागण्यास मोठी मदत होणार आहे.
– डॉ. अतुल भोसले, आमदार

Web Title: Cm devendra fadnavis order to administration reserve place home project after demand of karad mla dr atul bhosale marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2024 | 04:36 PM

Topics:  

  • CM Devendra Fadanvis
  • Dr Atul Bhosale

संबंधित बातम्या

Uddhav Thackeray: दसरा मेळाव्याआधी उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल; ‘…ते देशद्रोही’ म्हणत संताप व्यक्त
1

Uddhav Thackeray: दसरा मेळाव्याआधी उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल; ‘…ते देशद्रोही’ म्हणत संताप व्यक्त

‘संपूर्ण घरच त्यांच्या ताब्यात…’ अभिनेते किशोर कदम यांना बिल्डरकडून धोका? पोस्ट शेअर करत म्हणाले…
2

‘संपूर्ण घरच त्यांच्या ताब्यात…’ अभिनेते किशोर कदम यांना बिल्डरकडून धोका? पोस्ट शेअर करत म्हणाले…

मुंबईच्या गणेश विसर्जन सोहळ्याने परदेशी पर्यटक मंत्रमुग्ध, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केली बाप्पाची आरती..!
3

मुंबईच्या गणेश विसर्जन सोहळ्याने परदेशी पर्यटक मंत्रमुग्ध, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केली बाप्पाची आरती..!

Devendra Fadnavis: मराठा आणि OBC आरक्षणावरून मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका; “कोणाच्याही ताटातील काढून दुसऱ्याला देणार नाही”
4

Devendra Fadnavis: मराठा आणि OBC आरक्षणावरून मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका; “कोणाच्याही ताटातील काढून दुसऱ्याला देणार नाही”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.