Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगली’; मनसे नेत्यांकडून राज्य सरकारच्या योजनेचे कौतुक

मनसेकडून राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या माझी लाडकी बहीण योजनेचे कौतुक करण्यात आले आहे. संदीप देशपांडे यांनी माझी लाडकी बहीण योजना चांगली असल्याचे सांगितले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 06, 2024 | 12:38 PM
माझी लाडकी बहिण योजनेचे संदीप देशपांडेंकडून कौतुक

माझी लाडकी बहिण योजनेचे संदीप देशपांडेंकडून कौतुक

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्य सरकारकडून अर्थसंकल्प प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली. या अंतर्गत राज्यातील महिलांना दर महिन्याला प्रत्येकी दीड हजार रुपये देण्यात येणार आहेत. सामान्य लोकांना ही योजना अत्यंत आवडली असून अवघ्या काही दिवसांमध्ये याची लोकप्रियता वाढली आहे. यावरुन मात्र विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. सरकारी तिजोरीमधून मत मिळवण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका विरोधक करत आहे. दरम्यान, मनसेने राज्य सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेला पाठिंबा दिल्याचे दिसून येत आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी याबाबत वक्तव्य केले आहे. तसेच राज ठाकरे यांचे दौरे आता नियोजित केले जातील, अशी माहिती त्यांनी दिली.

माध्यमांशी संवाद साधताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या माझी लाडकी बहीण योजनेला पाठिंबा दिला. ते म्हणाले, राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेली ही एक चांगली योजना आहे. फक्त इम्प्लिमेंट करण्यात अजून योग्य पद्धतीने झाली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. तसेच रवींद्र वायकर यांना क्लीन चीट मिळाल्यानंतर संदीप देशपांडे यांनी खोचक टोला लगावल. संदीप देशपांडे म्हणाले, वायकर आता आनंदी असतील. कसा तपास केला आहे काय माहिती नाही.  आम्हाला पण अशी कुठली मशीन मिळाली तर बरं होईल, असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.

याआधी मनसे नेत्याचे वादग्रस्त विधान

आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी योजनेला पाठिंबा दिला असला तरी दोन दिवसांपूर्वी एका मनसे नेत्याने वादग्रस्त विधान केले होते. मनसे नेते प्रकाश महाजन यांनी मुस्लीम महिलांना या योजनेचा लाभ मिळू नये या आशयाचे वक्तव्य केले होते. प्रकाश महाजन म्हणाले, राज्य सरकारने दोन बायका किंवा दोनपेक्षा जास्त अपत्य असणाऱ्या महिलांना विशेषत: मुस्लीम महिलांना या योजनेचा फायदा देऊ नये, अशी मागणी प्रकाश महाजन यांनी केली.

Web Title: Cm mazi ladki bahin yojana scheme is appricable mns leader sandeep deshpande praised the state government plan nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2024 | 12:38 PM

Topics:  

  • Prakash Mahajan

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.