मिनी महाबळेश्वर गारठलं! तापमान थेट एकेरी अंकात; पर्यटकांचा ओढा वाढला

विशेष म्हणजे, रात्राच्या तापमानात मोठी घट होत असताना दिवसा मात्र उष्णता कायम आहे. दापोलीत कमाल ३१.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
Dapoli Mini  mahabaleshwar
Dapoli Winter (Image - AI)Cold wave in konkan
Published on: 
Updated on: 

महाराष्ट्राचे मिनी महाबळेश्वर थंडीने गारठले 
दिवस-रात्र तापमानात मोठी तफावत निर्माण

सुट्ट्यांमुळे पर्यटकांची मोठी गर्दी

दापोली: कोकणात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कड़ाका पडला असून रत्नागिरी जिल्ह्यातील मिनी महाबळेश्वर असलेल्या दापोली परिसरातही उष्णतेचा पारा घसरल्याने दापोलीत आलेल्या पर्यटकांनाही गुलाबी थंडीचा अनुभव घेता येत आहे. तापमानाने चक्क ९.३ अंशांवर पारा आला आहे. दापोलीत सलग दुसऱ्या दिवशी चक्क ९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे पहाटेच्या आणि रात्रीच्या वेळी हवेत चांगलाच गारवा जाणवत आहे. त्यामुळे यावर्षीचे सगळ्यात कमी तापमान ठरले आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या हवामान प्रक्षेत्रावर ही नोंद झाली आहे.

Pune Weather: हुडहुडी भरणार! पुणेकरांनो दोन दिवस स्वेटर घालूनच फिरा; तापमान थेट…

विशेष म्हणजे, रात्राच्या तापमानात मोठी घट होत असताना दिवसा मात्र उष्णता कायम आहे. दापोलीत कमाल ३१.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे दिवस-रात्र तापमानात मोठी तफावत निर्माण झाली आहे. या बदलत्या वातावरणामुळे आंबा बागायतदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. थंडीचा वाढता जोर आंबा मोहोरासाठी पोषक ठरण्याची शक्यता असल्याने बागायतदारांचे लक्ष हवामानाकडे लागले आहे. दिवसा उष्णता आणि रात्री कडाक्याची थंडी अशी स्थिती निर्माण झाल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी तापमानातील बदल लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.

पर्यटकांची मोठी गदी

सलग लागून आलेल्या सुट्टयांमुळे सध्या दापोली शहर तालुका परिसरात पर्यटकांचीही मोठी गर्दी आहे. दिवाळीपासून पर्यटनाचा हंगामही सुरू झाला आहे अशातच पडलेली गुलाबी थंडी यामुळे वातावरण आल्हाददायक आहे. हे अल्हाददायक वातावरण आंबा काजू बागांसाठी पोषक आहे. काही ठिकाणी पालवी फुटलेल्या आंब्याच्या कलमांना आता पालवी जून होऊन मोहोर येण्याची प्रक्रिया लवकर सुरू होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Cold Wave: राज्यात कुडीकुडी अन् हुडहुडी! धुळ्यात पारा ६.३ तर निफाडमध्ये ६.५ अंशांवर, पुण्यात किती?

तर तालुक्यातील किनारपट्टी भागात काही ठिकाणी साबुदाण्याच्या आकार एवढी फळधारणा झाल्याची माहिती हर्णे येथील आंबा बागायतदार सागर मयेकर यांनी दिली. यंदा हवानामुळे आंब्याचे पीक एकंदरीतच २५ ते ३० टक्के कमी येईल, असा अंदाज असतानाच सद्यस्थितीत असलेले पोषक हवामान आंबा बागायतदारांच्या अशा पल्लवीत करणारे ठरले आहे.

Q

दापोलीमध्ये किती अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे?

A

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे सलग दुसऱ्या दिवशी ९.३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.

Q

दापोलीमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद कुठे झाली?

A

दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या हवामान प्रक्षेत्रावर सर्वात कमी ९.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.