राज्यात कुडीकुडी अन् हुडहुडी! धुळ्यात पारा ६.३ तर निफाडमध्ये ६.५ अंशांवर, पुण्यात किती?
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे आणि निफाडनंतर जळगावमध्येही सर्वाधिक कमी तापमान नोंदवण्यात आले आहे. जळगावमध्ये पारा ८ अंशांवर पोहचला आहे. तर यवतमाळ, नाशिक आणि मालेगाव याठिकाणी १० अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे.परभणीच्या कृषी केंद्रात १०.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल पुण्याचा पाराही ११ अंश सेल्सिअसवर पोहचला आहे. थंडीचा कडाका वाढल्यामुळे नागरिकांना उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे.
Mumbai News: वांद्रे-धारावी दरम्यान नवीन पुलाच्या कामाला वेग; मिठी नदीवरील नवीन पुलाचे काम अंतिम
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ‘अक्वान’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यातील हवामानात मोठा बदल झाला आहे. अक्वानमुळे ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडक दिल्यानंतर त्याची ताकद कमी झाली आहे. पण हवामान प्रणालीमुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभावामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान खाली आले आहे.
दुसरीकडे कोकण विभागात मात्र कमाल तापमान 32 अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले आहे. तर किमान तापमान 16 ते 18 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणातील अनेक भागांमध्ये दिवसा उष्णता तर रात्री थंडी जाणवू लागली आहे. यासोबत पहाटेच्या वेळी गारवा वाढू लागला आहे. पुढील दोन ते तीन दिवसात तापमानात बदल होण्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे.
मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्येही तापमानाचा पारा खाली आला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये १२.४, धाराशिवमध्ये १३, नांदेडमध्ये १४.८, तर परभणीमध्ये १६.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मागील आठवडाभर छत्रपती संभाजीनगरमधील किमान तापमान १५ ते १६ अंशांच्या दरम्यान होते. मात्र, त्यात घट होऊन पारा १२.४ अंशांवर पोहोचला. यंदाच्या हंगामातील हे आतापर्यंतचे नीचांकी तापमान ठरले आहे.
भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) अंदाजानुसार, पुढील २४ तासांत महाराष्ट्रातील काही भागांमध्ये किमान तापमानात आणखी दोन ते तीन अंशांची घट होण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला नाही.
Ans: राज्यात सर्वाधिक कमी तापमान धुळे येथे ६.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले असून, त्याखालोखाल नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये ६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
Ans: जळगावमध्ये ८ अंश सेल्सिअस, परभणीच्या कृषी केंद्रात १०.१ अंश सेल्सिअस आणि पुण्यात ११ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे.
Ans: बंगालच्या उपसागरातील ‘अक्वान’ चक्रीवादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकल्यानंतर त्याची ताकद कमी झाली; मात्र या हवामान प्रणालीमुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढल्याने राज्यातील तापमान खाली आले आहे.






