Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिव्यांगाच्या समस्यांचे नियमित बैठक‍ा घेऊन निराकरण करावे – आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड

दिव्यांगाना योग अभ्यासासाठी आर्ट ऑफ लिव्हींग यांच्याकडून कॅम्पचे आयोजन करणे, दिव्यांगासाठी शैक्षणिक दर्जा उंचावणे तसेच इतर लाभ मिळणेसाठी काउन्सेलिंग सेंटरमधून फॅसिलिटेशन सुरु करणे इत्यादी बाबींवर सदर बैठकीत चर्चा करण्यात आली.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 08, 2024 | 03:45 PM
दिव्यांगाच्या समस्यांचे नियमित बैठक‍ा घेऊन निराकरण करावे – आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड
Follow Us
Close
Follow Us:

कल्याण : दिव्यांगाच्या समस्यांबाबत विभागप्रमुख यांनी नियमित बैठका घेऊन निराकरण करावे असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी महापालिका मुख्यालयातील आयुक्त दालनात संपन्न झालेल्या बैठकीत दिले आहेत. सदर बैठकीस महापालिकेचे अति. आयुक्त हर्षल गायकवाड, विभागप्रमुख संजय जाधव, समाजविकास अधिकारी प्रशांत गव्हाणकर तसेच दिव्यांग संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

03 डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून दिव्यांगाकरीता स्पर्धा आयोजित करणे, महापालिकेच्या मुख्यालयासह १० प्रभाग क्षेत्र कार्यालयात शौचालय सुविधा पुरविणे, दिव्यांगाच्या वैद्यकिय प्रतिपूर्तीची प्रकरणे जलद गतीने मार्गी लावणे, ‍दिव्यांगाना योग अभ्यासासाठी आर्ट ऑफ लिव्हींग यांच्याकडून कॅम्पचे आयोजन करणे, दिव्यांगासाठी शैक्षणिक दर्जा उंचावणे तसेच इतर लाभ मिळणेसाठी काउन्सेलिंग सेंटरमधून फॅसिलिटेशन सुरु करणे इत्यादी बाबींवर सदर बैठकीत चर्चा करण्यात आली.

महापालिकेकडून स्टॉल देणे बंद केले असून फुटपाथवर स्टॉल उभारणेस परवानगी दिली जाणार नाही, तथापी जे पात्र, अधिकृत आहेत, अशा दिव्यांगाकडून प्राप्त झालेल्या अर्जांची प्रतिक्षा यादी तयार करण्यात येईल. जेव्हा महानगरपालिकेकडे बांधीव वास्तू प्राप्त होतील तेव्हा पुनर्वसन करण्यात येईल. रस्त्यांच्या फुटपाथवर स्टॉल उभारणेस परवानगी दिली जाणार नाही. अशी माहिती यावेळी उपस्थित प्रतिनिधींना देण्यात आली त्याप्रमाणे दिव्यांगाना घरकुल योजना राबविणे अनुषंगाने सकारात्मक विचार करुन शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल अशी माहिती यावेळी आयुक्तांनी या बैठकीत दिली आहे.

तसेच दिव्यांग वैद्यकिय प्रतिपूर्तीमध्ये ज्या आजारांचा समावेश नाही अशा आजारांवर महात्मा ज्योतिबा फुले योजनेतून मोफत उपचार सुरु करण्या संदर्भात निर्णय घेण्यात आले आहेत, त्याप्रमाणे दिव्यांग पेन्शन महिन्याच्या १० तारखेपुर्वी दिव्यांगाना देण्यात येईल, दिव्यांग संस्थांना कार्यक्रमाकरीता आवश्यकतेनुसार महिन्यातून एकदा मोफत महापालिकेचे सभागृह उपलब्ध करुन देण्यात येईल अशी माहिती सदर बैठकीतील उपस्थितांना देण्यात आली.

Web Title: Commissioner dr indurani jakhad says the problems of the disabled should be solved by holding regular meetings

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2024 | 03:45 PM

Topics:  

  • Dombivli News
  • kalyan news

संबंधित बातम्या

Kalyan Gramin News : अनधिकृत इमारत रहिवाशांना दिलासा ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  बैठकीत घेतले महत्वाचे निर्णय
1

Kalyan Gramin News : अनधिकृत इमारत रहिवाशांना दिलासा ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत घेतले महत्वाचे निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.