Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BJP Politics: विधान परिषदेत भाजपमध्ये नेतृत्वाची चुरस? फडणवीसांच्या विश्वासू नेत्यांमध्येच चढाओढ

या नेत्यांमध्ये विधान परिषदेत प्रभावी नेतृत्वासाठी चुरस सुरू आहे. फडणवीसांच्या पाठिंब्यामुळे प्रवीण दरेकर हे सध्या परिषदेतील प्रमुख चेहरा मानले जात असले तरी, भविष्यात या नेतृत्वासाठी मोठी स्पर्धा दिसून येऊ शकते

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 07, 2025 | 02:32 PM
BJP Politics: विधान परिषदेत भाजपमध्ये नेतृत्वाची चुरस? फडणवीसांच्या विश्वासू नेत्यांमध्येच चढाओढ
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  विधान परिषदेतील प्रमुख नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे अनिल परब यांच्या विरोधात आंदोलनाचे नेतृत्व केले. मात्र, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी घोषणाबाजी करत आंदोलन ताब्यात घेतले आणि सकाळपासूनच आपला आक्रमक आवाज घुमवला. यामुळे विधान परिषदेत भाजपच्या नेतृत्वावर नव्या चर्चेला उधाण आले आहे. प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांच्यात नेतृत्वासाठी चुरस सुरू असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. चित्रा वाघ यांच्या आक्रमक भूमिकेमुळे त्या पुढे येतील का? याकडे आता भाजप कार्यकर्त्यांचे आणि राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.

विधान परिषदेत भाजपची मजबूत ताकद असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या विश्वासातील आणि सत्ताकांक्षी नेत्यांना विधान परिषदेत स्थान दिले आहे. माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, सदाशिव खोत, श्रीकांत भारती, परिणय फुके आणि निरंजन डावखरे यांसारखे नवे-जुने नेते पक्षात सक्रिय आहेत.

राज्यपालांचं अभिभाषण गेलं कबुतराच्या भोXXX; निंदनीय शब्दांत टीका करणाऱ्या अनिल परब यांना भाजप नेत्यांचा दणका

या नेत्यांमध्ये विधान परिषदेत प्रभावी नेतृत्वासाठी चुरस सुरू आहे. फडणवीसांच्या पाठिंब्यामुळे प्रवीण दरेकर हे सध्या परिषदेतील प्रमुख चेहरा मानले जात असले तरी, भविष्यात या नेतृत्वासाठी मोठी स्पर्धा दिसून येऊ शकते. विशेषतः प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यात राजकीय वर्चस्वासाठी टशन पाहायला मिळते. यामुळे, विधान परिषदेत भविष्यात भाजपच्या नेतृत्वाची दिशा कोण ठरवणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

विधान परिषदेत आमदार झाल्यानंतर काही महिन्यांतच चित्रा वाघ यांनी आपली ओळख आक्रमक नेत्या म्हणून प्रस्थापित केली आहे. भाजपच्या संघटनेत त्यांचा मोठा प्रभाव असून, सत्तेचा भाग असो वा नसो, त्या विरोधकांवर कठोर शब्दांत टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापासून ते मुंबईतील अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत, त्यांनी आपल्या आक्रमक शैलीने छाप पाडली आहे. सभागृहातील चर्चांमध्ये त्या प्रखरपणे सहभागी होत असून, त्यांचा दबदबा स्पष्टपणे जाणवत आहे.

लाडक्या बहिणींसाठी खूशखबर! महिला दिनी मिळणार दोन महिन्यांचे पैसे, महायुती सरकारची घोषणा

शिवसेना नेते अनिल परब यांच्या विधानावरून गोंधळ

अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद झाला. गुरुवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते अनिल परब यांनी संभाजी महाराज यांच्याशी स्वतःची तुलना केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला, त्यानंतर सभागृहात गोंधळ उडाला. यानंतर, शुक्रवारी सत्ताधारी पक्षाने विधानसभेच्या पायऱ्यांवर परब यांच्या विरोधात आंदोलन केले. यामुळे राजकीय वातावरण तापले असून, विधान परिषदेत चित्रा वाघ यांची आक्रमक भूमिका अधोरेखित झाली आहे.

Web Title: Competition is fierce among leaders trusted by fadnavis for leadership in the legislative council nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2025 | 02:32 PM

Topics:  

  • chitra wagh

संबंधित बातम्या

Marathwada Rain: “सगळे जण शेतकऱ्यांच्या बांधावर…”; भाजप नेत्या चित्रा वाघ काय म्हणाल्या?
1

Marathwada Rain: “सगळे जण शेतकऱ्यांच्या बांधावर…”; भाजप नेत्या चित्रा वाघ काय म्हणाल्या?

Maratha Reservation: “काय उचकायचं ते उचका, मी त्यांना…”; जरांगे पाटलांच्या टिकेला चित्रा वाघांचे प्रत्युत्तर
2

Maratha Reservation: “काय उचकायचं ते उचका, मी त्यांना…”; जरांगे पाटलांच्या टिकेला चित्रा वाघांचे प्रत्युत्तर

अतिच झालं! मनोज जरांगे पाटलांनी आता केली हद्द, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आईचा अपमान? पहा व्हिडिओ
3

अतिच झालं! मनोज जरांगे पाटलांनी आता केली हद्द, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आईचा अपमान? पहा व्हिडिओ

…तेंव्हा तू झोपली होतीस का? चित्रा वाघ यांच्या आरोपावर जरांगे पाटील संतापले
4

…तेंव्हा तू झोपली होतीस का? चित्रा वाघ यांच्या आरोपावर जरांगे पाटील संतापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.