Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rail One App: रेल्वेच्या ‘रेल वन’ अॅपबाबत प्रवाशांच्या तक्रारींत वाढ; तिकीट बुकिंगमध्ये तांत्रिक बिघाड

रेल्वेकडून या अॅपची मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करण्यात आली होती. अनेक वर्षांपासून वापरात असलेले यूटीएस अॅप टप्याटप्प्याने बंद करून प्रवाशांना 'रेल वन' अॅप वापरण्याचे आवाहन करण्यात आले.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 16, 2026 | 12:24 PM
Rail One App Technical Issues, Indian Railways,

Rail One App Technical Issues, Indian Railways,

Follow Us
Follow Us:
  • रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेल्या ‘रेल वन’ अॅपबाबत प्रवाशांच्या तक्रारी
  • अनेक वर्षांपासून वापरात असलेले यूटीएस अॅप टप्याटप्प्याने बंद
  • ‘रेल वन’ अॅपमधील तांत्रिक त्रुटीविरोधात प्रवाशांनी सोशल मीडियावर तीव्र नाराजी
Rail One App Technical Issues:   प्रवाशांना रेल्वेच्या सर्व सेवा एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेल्या ‘रेल वन’ अॅपबाबत प्रवाशांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. तिकीट बुकिंग केल्यानंतर बँक खात्यातून पैसे वजा होतात. मात्र, अॅपमध्ये तिकीट दिसत नसल्याच्या तक्रारी अनेक प्रवाशांनी केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रेल्वेकडून या अॅपची मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करण्यात आली होती. अनेक वर्षांपासून वापरात असलेले यूटीएस अॅप टप्याटप्प्याने बंद करून प्रवाशांना ‘रेल वन’ अॅप वापरण्याचे आवाहन करण्यात आले.

– मात्र, प्रत्यक्ष वापर सुरू झाल्यानंतर काही – तांत्रिक अडचणी समोर येत असल्याचे प्रवासी सांगत आहेत.
– प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या या अॅपमध्येच अडचणी येत असल्याने रेल्वेच्या डिजिटल सेवांबाबत
प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Bhimashankar VIP Darshan : दुबे काय तुमचा जावई आहे का? भीमाशंकर दर्शनावरुन रोहिणी खडसेंची सरकारला चपराक

पैसे वजा झाल्यास तिकीट द्यावे किंवा रक्कम तातडीने परत करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. या संदभांत रेल्वेकडे तक्रार केल्यानंतर आवश्यक कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाऱ्याकडे पाठविण्यात आले आहे, असा प्रतिसाद दिला जात असल्याचे प्रवासी सांगत आहेत. अशा तक्रारी दिवसेंदिवस वाढत असल्याचेही समोर आले आहे. तिकीट काढूनही तिकीट दिसत नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.

तिकीटासाठी पैसे वजा; पुष्टीकरण मात्र नाही

मानवेंद्र राघव या प्रवाशाने गावी जाण्यासाठी ‘रेल वन’ अॅपद्वारे तात्काळ तिकीट काढण्याचा प्रयत्न केला. बुकिंगची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या खात्यातून ६७३.१५ रुपये वजा झाल्याचा बँकेचा संदेशही मिळाला, मात्र, सहा तास उलटूनही तिकीट बुकिंगचा कोणताही संदेश, ई-मेल किंवा अॅपमध्ये नोद दिसत नसल्याची तक्रार त्यांनी केली.

Nashik Crime: वाढदिवशीच आश्रमशाळेतून निघून गेला…,दोन दिवसांनी 17 वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह झाडाला

 

जुन्या तिकिटांचा तपशीलही गायब?

आनंद श्री या प्रवाशाने जानेवारी महिन्यात याच अॅपद्वारे तिकीट बुकिंग करून प्रवास केला होता. त्यावेळी माय बुकिंग’ विभागात तिकीट दिसत होते. मात्र कार्यालयीन कारणासाठी जुन्या तिकिटाची प्रत काढण्याचा प्रयत्न केल्यावर ‘जनीं कम्प्लीट’ विभागात तिकीट दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले. अनेक वेळा रिफ्रेश करूनही समस्या कायम असल्याचे त्यानी नमूद केले.

सोशल मीडियावर संतापाची लाट

१.’रेल वन’ अॅपमधील तांत्रिक त्रुटीविरोधात प्रवाशांनी सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

२.तिकीट बुकिंग अयशस्वी होऊनही पैसे वजा झाल्याचे पुरावे म्हणून स्क्रीनशॉट पोस्ट करण्यात आले.

३. तक्रार नोंदवल्यानंतरही त्वरित प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप काही प्रवाशांनी केला.

४. अॅपमधील त्रुटी तातडीने दुरुस्त करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली,

 

 

Web Title: Complaints rise against railways rail one app over technical glitches

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 12:24 PM

Topics:  

  • Indian Railways

संबंधित बातम्या

Hadapsar Ghorpadi 3rd Railway Line: हडपसर-घोरपडी तिसऱ्या रेल्वे मार्गिकेच्या कामाला वेग; ‘डी-१५ ब्लॉक’चा पहिला टप्पा यशस्वी!
1

Hadapsar Ghorpadi 3rd Railway Line: हडपसर-घोरपडी तिसऱ्या रेल्वे मार्गिकेच्या कामाला वेग; ‘डी-१५ ब्लॉक’चा पहिला टप्पा यशस्वी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.