खासदार निशिकांत दुबे भीमाशंकर व्हीआयपी दर्शनावरुन खासदार निशिकांत दुबे यांचा आक्रमक पवित्रा (फोटो - टीम नवराष्ट्र)
दुरुस्तीच्या कामामुळे भीमाशंकर मंदिर हे भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. महाशिवरात्रीदिनी देखील मंदिर प्रशासनाने बंद ठेवले. यामुळे भाविकांचा हिरमोड झाला. त्याचबरोबर व्यावसायिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. मात्र यावेळी कोणतेही संवेदनशीलता दाखवण्यात आली नाही. पण भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यासाठी मंदिराचे दरवाजे खुले करण्यात आले. झारखंड राज्यातील गोड्डा लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार निशिकांत दुबे हे शनिवार दिनांक १४ रोजी भीमाशंकर येथे आले होते. ते हेलिकॉप्टरने मंदिर परिसरात दाखल झाले आणि त्यांना विशेष परवानगी देऊन मंदिरात दर्शन घडवण्यात आले. यावरुन नाराजी व्यक्त होत आहे.
हे देखील वाचा : “वास्तव हे कल्पनेपेक्षाही अधिक भयंकर…; बारामती पोटनिवडणूकीवर रोहित पवारांची भावनिक पोस्ट
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला मोर्चा प्रमुख रोहिणी खडसे यांनी सोशल मीडिया पोस्ट केली आहे. यामधून त्यांनी खासदार निशिकांत दुबे यांना दिलेल्या व्हीआयपी ट्रीटमेंटवरुन जोरदार निशाणा साधला. रोहिणी खडसे यांनी लिहिले आहे की, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले आपल्या महाराष्ट्रातील भीमाशंकर मंदिर पुरातत्त्व विभागाच्या कामासाठी गेल्या अडीच महिन्यांपासून सर्वसामान्य भाविकांसाठी बंद आहे पण भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांच्यासाठी हे मंदिर खुले करण्यात आले.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले आपल्या महाराष्ट्रातील भीमाशंकर मंदिर पुरातत्त्व विभागाच्या कामासाठी गेल्या अडीच महिन्यांपासून सर्वसामान्य भाविकांसाठी बंद आहे पण भाजपचे खासदार @nishikant_dubey यांच्यासाठी हे मंदिर खुले करण्यात आले. हे निशिकांत दुबे कोण आहेत माहिती आहे का ? जे… pic.twitter.com/61GsdRz21p — Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) March 15, 2026
हे निशिकांत दुबे कोण आहेत माहिती आहे का ? जे नेहमी मराठी माणसाला कमी लेखतात, जे नेहमी मराठी माणसांबद्दल चुकीचे विधान करून मराठी माणसांचा स्वाभिमान दुखवतात. एकदा ते म्हणाले की “मराठी लोगो को हम पटक पटक के मारेंगे”. आज त्याच निशिकांत दुबे साठी महाराष्ट्रातील प्रशासन पायघड्या घालत आहे. सामान्य माणसांना वेगळा न्याय आणि महाराष्ट्रद्रोही निशिकांत दुबे यांना वेगळा न्याय का ? दुबे काय तुमचा जावई आहे का? असा प्रश्न रोहिणी खडसे यांनी उपस्थित केला आहे.
हे देखील वाचा : बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक जाहीर; ‘या’ तारखेला होणार मतदान अन् निकाल






