पुणे: पुणे शहरात गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) या दुर्मिळ आजाराने धोका वाढला आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 67 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. सिंहगड रोड परिसरातील नांदेड गाव, किरकटवाडी आणि धायरी या भागांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव जास्त असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गुलियन बॅरी सिंड्रोमचे सुरुवातीचे लक्षण अशक्तपणा आणि हातापायाला मुंग्या येणे असे आहे. पुण्यातील बाधित रुग्णांमध्ये या लक्षणांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर दिसून आले आहे.
शहरातील वाढत्या रुग्णांची संख्या पाहता महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी बुधवारी नांदेड गावात प्रत्यक्ष पाहणी केली. गावात असलेल्या विहिरीत शेवाळ जमा झाले असून, याच विहिरीतून पाणीपुरवठा होत असल्याचे आढळले आहे. या विहिरींचा आणि पाणीपुरवठ्याचा अभ्यास करून तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेश आयुक्त भोसले यांनी दिले आहेत.
Richest Chief Minister in India: कोण आहेत भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री?
त्याचबरोबर, नव्याने समाविष्ट गावांमधील विहिरी, पाण्याच्या टाक्या, तसेच आजाराने बाधित भाग व नागरिक यांची भेट घेतली. तसेच रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या आरोग्याची चौकशी करत विचारपूस केली. त्याचवेळी त्यांनी या परिसरातील महापालिकेच्या संबंधित विभागांना आणि ग्रामीण जिल्हा परिषद आरोग्य विभागाला त्वरित उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले. आयुक्तांच्या आदेशानंतर ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभाग युद्धपातळीवर काम करत आहे.
मुंबईसह ठाण्यात बर्ड फ्लूचा वाढला धोका; 4200 पिल्लांच्या मृत्यूमुळे लातूरमध्ये खळबळ
गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) या आजाराचा धोका पुण्यात वाढत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या 59 वरून 67 वर पोहोचली आहे. डॉक्टरांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
यापैकी सुमारे 80टक्के रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असून, उर्वरित 20 टक्के रूग्ण सरकारी रुग्णालय, विशेषतः ससून रुग्णालयात उपचार घेत आहेत.
गुलियन बॅरी सिंड्रोम हा पोस्ट-वायरल आणि पोस्ट-बॅक्टेरियल आजार आहे.
सध्याच्या परिस्थितीवर शरद पवारांनी केलं मोठं विधान; म्हणाले, ‘राज्यात एकप्रकारे
नागरिकांनी खबरदारी घेतल्यास आणि वेळेत उपचार घेतल्यास या आजारावर नियंत्रण मिळवता येऊ शकते, असेही तज्ज्ञांनी सांगितले आहे.