• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • India »
  • Who Is The Richest Chief Minister Of India Nras

Richest Chief Minister in India: कोण आहेत भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री?

राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्याकडे 1 कोटी रुपयांची संपत्ती आणि 46 लाख रुपयांचे दायित्व आहे.दिल्लीचे मुख्यमंत्री आतिशी यांच्याकडे 1 कोटी रुपयांची संपत्ती असून दायित्वे शून्य आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 31, 2024 | 01:50 PM
Richest Chief Minister in India: कोण आहेत भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री?

Photo Credit - Team Navrashtra कोण आहेत भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू हे 931 कोटी रुपयांच्या मालमत्तेसह भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत, तर पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी या केवळ 15 लाख रुपयांच्या संपत्तीसह सर्वात कमी संपत्ती असलेल्या मुख्यमंत्री आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) च्या सोमवारी जाहीर झालेल्या अहवालात ही आकडेवारी समोर आली आहे.

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या अहवालानुसार,  प्रत्येक राज्य विधानसभा आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांची सरासरी मालमत्ता 52.59 कोटी रुपये आहे. तर 2023-2024 साठी भारताचे दरडोई निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न अंदाजे 1,85,854 रुपये होते. मुख्यमंत्र्यांचे सरासरी स्व-उत्पन्न 13,64,310 रुपये आहे, जे भारताच्या सरासरी दरडोई उत्पन्नाच्या सुमारे 7.3 पट आहे. देशातील 31 मुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती 1,630 कोटी रुपये आहे. देशातील 31 मुख्यमंत्र्यांपैकी फक्त दोनच महिला आहेत.  पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी आणि दिल्लीच्या आतिशी.

Viral Video: Gen – Z नवरीची नौटंकी संपेना पाठवणीच्या वेळी केला कहर: आईला म्हणाली

पेमा खांडू दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत मुख्यमंत्री

ADR च्या अहवालानुसार अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू हे 332 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असलेले दुसरे सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. तर पेमा खांडू यांच्यावर 180  कोटी रुपयांचे दायित्व आहे.

या यादीत कर्नाटकचे सिद्धरामय्या हे 51 कोटी रुपयांहून अधिक संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत मुख्यमंत्री  आहेत. तसेच जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे 55 लाख रुपयांच्या संपत्तीसह यादीत दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. केरळच्या मुख्यमंत्र्यांबद्दल बोलायचे झाले तर, 118 कोटी रुपयांसह पिनाराई विजयन हे तिसरे सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत.

अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यावर 180 कोटी रुपयांचे सर्वाधिक दायित्व आहे. सिद्धरामय्या यांच्यावर २३ कोटी आणि नायडू यांच्यावर १० कोटींहून अधिकचे दायित्व असल्याचे अहवालात म्हटले आहे. तसेच,  ADR अहवालानुसार,  13 (42 टक्के) मुख्यमंत्र्यांनी स्वत: विरुद्ध गुन्हेगारी प्रकरणे घोषित केली आहेत, तर 10 (32 टक्के) यांनी खुनाचा प्रयत्न, अपहरण, लाचखोरी आणि गुन्हेगारी धमकीशी संबंधित गंभीर गुन्हेगारी प्रकरणे घोषित केली आहेत.

थंडीच्या दिवसांमध्ये नियमित करा अळशीच्या लाडूचे सेवन, मधुमेह आणि वाढलेले कोलेस्ट्रॉल

एडीआरच्या अहवालानुसार, जाणून घ्या कोणत्या मुख्यमंत्र्यांची किती संपत्ती

-नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रिओ यांची एकूण संपत्ती 46 कोटी रुपये आहे. त्याच्यावर आठ लाख रुपयांचे दायित्व आहे.

-मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याकडे 42 कोटींची संपत्ती आहे. त्यांच्यावर आठ कोटी रुपयांची देणी आहे.

– झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याकडे 25 कोटी रुपयांची संपत्ती असून त्यांच्यावर 3 कोटी रुपयांचे दायित्व आहे.

– आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा यांच्याकडे 17 कोटी रुपयांची संपत्ती आणि 3 कोटी रुपयांचे दायित्व आहे.

– महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 13 कोटी रुपयांची संपत्ती आणि 62 लाखांचे दायित्व आहे.

-गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याकडे 8 कोटी रुपयांची संपत्ती आणि 1 कोटी रुपयांचे दायित्व आहे.

Deva: शाहिद कपूरच्या ‘देवा’ चित्रपटाचे नवे पोस्टर लवकरच होणार रिलीज? अमिताभ बच्चन

-हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सुखू यांच्याकडे 7 कोटी रुपयांची संपत्ती आणि 22 लाख रुपयांचे दायित्व आहे.

– हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांच्याकडे 5 कोटी रुपयांची संपत्ती आणि 74 लाख रुपयांचे दायित्व आहे.

-उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांकडे 4 कोटी रुपयांची संपत्ती आणि 47 लाख रुपयांचे दायित्व आहे.

– छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांच्याकडे 3 कोटी रुपयांची संपत्ती आणि 65 लाख रुपयांचे दायित्व आहे.

-पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याकडे 1 कोटी रुपयांची संपत्ती आणि 30 लाखांचे दायित्व आहे.

-बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे 1 कोटी रुपयांची संपत्ती असून दायित्वे शून्य आहेत.

थंडीच्या दिवसांमध्ये नियमित करा अळशीच्या लाडूचे सेवन, मधुमेह आणि वाढलेले कोलेस्ट्रॉल

-यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे 1 कोटी रुपयांची संपत्ती असून दायित्वे शून्य आहेत.

-राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्याकडे 1 कोटी रुपयांची संपत्ती आणि 46 लाख रुपयांचे दायित्व आहे.

-दिल्लीचे मुख्यमंत्री आतिशी यांच्याकडे 1 कोटी रुपयांची संपत्ती असून दायित्वे शून्य आहेत.

Web Title: Who is the richest chief minister of india nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2024 | 01:50 PM

Topics:  

  • Chandrababu Naidu
  • Mamta Banarjee

संबंधित बातम्या

SIR साठी बंगाल तयार नाही, 2 वर्षांनंतर या; ममता बॅनर्जी सरकारचं निवडणूक आयोगाला उत्तर
1

SIR साठी बंगाल तयार नाही, 2 वर्षांनंतर या; ममता बॅनर्जी सरकारचं निवडणूक आयोगाला उत्तर

ममता बॅनर्जींच्या तृणमूलमधील वाद चव्हाट्यावर; कल्याण बॅनर्जींनी दिला पदाचा राजीनामा
2

ममता बॅनर्जींच्या तृणमूलमधील वाद चव्हाट्यावर; कल्याण बॅनर्जींनी दिला पदाचा राजीनामा

बंगालच्या ममता दीदींनी आणले भाजपच्या नाकी नऊ; अनेक लक्षवेधी योजनांनंतरही पडले थंड
3

बंगालच्या ममता दीदींनी आणले भाजपच्या नाकी नऊ; अनेक लक्षवेधी योजनांनंतरही पडले थंड

मुख्यमंत्र्यांच्या बायकोची कमाल भारी…; एका दिवसात कमावले कोट्यवधी रुपये, आकडा वाचून फिरतील डोळे
4

मुख्यमंत्र्यांच्या बायकोची कमाल भारी…; एका दिवसात कमावले कोट्यवधी रुपये, आकडा वाचून फिरतील डोळे

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मासिक पाळीमध्ये खूप कमी रक्तस्त्राव होतो? रोजच्या आहारात नियमित करा ‘या’ पदार्थांचा समावेश, शरीराला होतील फायदे

मासिक पाळीमध्ये खूप कमी रक्तस्त्राव होतो? रोजच्या आहारात नियमित करा ‘या’ पदार्थांचा समावेश, शरीराला होतील फायदे

Todays Gold-Silver Price: तुमच्या शहरात काय आहेत आजचे सोन्याचांदीचे दर? जाणून घ्या सविस्तर

Todays Gold-Silver Price: तुमच्या शहरात काय आहेत आजचे सोन्याचांदीचे दर? जाणून घ्या सविस्तर

Asia Cup 2025 : आज होणार भारतीय संघाची आशिया कपसाठी घोषणा! अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग 11

Asia Cup 2025 : आज होणार भारतीय संघाची आशिया कपसाठी घोषणा! अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग 11

Ganeshotsav 2025 : भारताच्या या भागात मोठ्या जल्लोषात साजरा होतो गणेशोत्सव; आताच करा जाण्याची तयारी

Ganeshotsav 2025 : भारताच्या या भागात मोठ्या जल्लोषात साजरा होतो गणेशोत्सव; आताच करा जाण्याची तयारी

लहान मुलांसाठी सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा चॉकलेट पॅनकेक्स, नोट करून घ्या सोपी रेसिपी

लहान मुलांसाठी सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा चॉकलेट पॅनकेक्स, नोट करून घ्या सोपी रेसिपी

Aja Ekadashi: एकादशीच्या दिवशी चुकूनही करु नका या चुका, अन्यथा मोडू शकतो तुमचा उपवास 

Aja Ekadashi: एकादशीच्या दिवशी चुकूनही करु नका या चुका, अन्यथा मोडू शकतो तुमचा उपवास 

34 KM चा मायलेज देणाऱ्या ‘या’ कारला ग्राहकांनी घेतले डोक्यावर, किंमत 6 लाखांपेक्षा कमी

34 KM चा मायलेज देणाऱ्या ‘या’ कारला ग्राहकांनी घेतले डोक्यावर, किंमत 6 लाखांपेक्षा कमी

व्हिडिओ

पुढे बघा
Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी संकटात, शेतातील पीक झाले आडवे

Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी संकटात, शेतातील पीक झाले आडवे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.