Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जत तालुक्यातील ४२ गावांच्या पाणी योजनेसाठी निधी उपलब्धतेची ग्वाही, बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

म्हैसाळ उपसा सिंचन योजना आणि गावा-गावांतील पाणी पुरवठा योजनांची कामे यांना गती देणे आवश्यक आहे. विस्तारीत उपसा सिंचन योजनेसाठीची सुधारित प्रशासकीय मान्यता, ते प्रत्यक्ष काम सुरु होणे यासाठी सर्वच पातळ्यांवर कार्यवाहीला गती द्या. एकीकडे तांत्रिक बाबी, आराखडे तसे अनुषंगिक बाबी पूर्ण करण्यावर भर द्यावा. विस्तारीत योजनेतून पाणी मिळवण्याचा टप्पा तसेच वितरण जाळे यांचे काम यांचा ताळमेळ साधा.

  • By Amrut Sutar
Updated On: Dec 02, 2022 | 07:41 PM
जत तालुक्यातील ४२ गावांच्या पाणी योजनेसाठी निधी उपलब्धतेची ग्वाही, बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : जत (Jat sangali) तालुक्यातील गावांसाठी महत्वाची विस्तारीत म्हैसाळ उपसा सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करा. उपसा सिंचन योजना आणि गावागावातील पाणी पुरवठा योजना पुर्ण करण्यासाठी विविध विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी. या कामांसाठी आवश्यक निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज येथे सांगितले. तसेच सीमा भागातील या गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक त्या आरोग्य, शिक्षण, वीज तसेच पायाभूत सुविधा यासाठी संबंधित विभागांनी समन्वय राखून कार्यवाही करावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिल्या.

[read_also content=”… तर आधी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा – नाना पटोले https://www.navarashtra.com/maharashtra/o-first-the-chief-minister-should-resign-nana-patole-350384.html”]

मुख्यमंत्री म्हणाले की, या परिसरातील गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी विस्तारीत म्हैसाळ उपसा सिंचन योजना आणि गावा-गावांतील पाणी पुरवठा योजनांची कामे यांना गती देणे आवश्यक आहे. विस्तारीत उपसा सिंचन योजनेसाठीची सुधारित प्रशासकीय मान्यता, ते प्रत्यक्ष काम सुरु होणे यासाठी सर्वच पातळ्यांवर कार्यवाहीला गती द्या. एकीकडे तांत्रिक बाबी, आराखडे तसे अनुषंगिक बाबी पूर्ण करण्यावर भर द्यावा. विस्तारीत योजनेतून पाणी मिळवण्याचा टप्पा तसेच वितरण जाळे यांचे काम यांचा ताळमेळ साधा. पाण्यापासून वंचित या गावांना दिलासा देण्यासाठी आणि या गावांसाठीच्या पाणी योजनांसाठी उद्भव स्त्रोत असणारे तलावांमध्ये वेळेत पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी सर्व बाबींसाठी कालबद्ध पद्धतीने आणि नेमके नियोजन करा,असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेनंतर आरोग्य सुविधांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण आणि तेथील पदभरती, शिक्षकांची पदभरती, शाळांसाठी आवश्यक निधीसाठीची तरतूद याबाबत विशेष बाब म्हणून जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागांनी प्रस्ताव तयार करावेत. याभागातील रस्ते आणि पायाभूत सुविधांबाबत विविध विभागांनी समन्वय राखून कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. विशेषतः जत, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि तासगांव या तालुक्यात द्राक्ष आणि डाळींबाच्या बागांचा सिंचन हा महत्वाचा मुद्दा आहे. या बागांना दिवसा पाणी देता यावे यासाठी भारनियमनाच्या वेळांमध्ये सवलत देण्यासाठी एमईआरसी आणि विविध यंत्रणांनी विशेष बाब सकारात्मक पावले उचलण्याचे निर्देशही देण्यात आले.

सह्याद्री राज्य अतिथीगृहात जत तालुक्यातील या गावांच्या विविध प्रश्नांविषयी आयोजित बैठकीस कामगार तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, खासदार संजयकाका पाटील, आमदार विक्रमसिंह सावंत, माजी आमदार प्रकाश शेंडगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव अभा शुक्ला, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे सचिव संजीव जयस्वाल, सांगलीचे जिल्हाधिकारी एम. राजा दयानिधी, सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी आदी उपस्थित होते.

Web Title: Confirmation of availability of funds for water scheme of fourty two villages in jat taluka cm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2022 | 07:40 PM

Topics:  

  • Cm Eknath Shinde
  • Jat taluka

संबंधित बातम्या

जतचा दुष्काळ कायमचा हटवणार; आमदार गोपीचंद पडळकर यांचे आश्वासन
1

जतचा दुष्काळ कायमचा हटवणार; आमदार गोपीचंद पडळकर यांचे आश्वासन

निकाल येईपर्यंत कुणाल कामराला होणार नाही अटक; मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकेला स्थगिती!
2

निकाल येईपर्यंत कुणाल कामराला होणार नाही अटक; मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकेला स्थगिती!

Water News: तापमान वाढीमुळे भूजल पातळीत घट; तलाव,विहिरींची पाणीपातळी खालावली
3

Water News: तापमान वाढीमुळे भूजल पातळीत घट; तलाव,विहिरींची पाणीपातळी खालावली

तापमान वाढीमुळे भूजल पातळीत घट; पाण्याअभावी पिके करपण्याच्या अवस्थेत
4

तापमान वाढीमुळे भूजल पातळीत घट; पाण्याअभावी पिके करपण्याच्या अवस्थेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.