
Pune Election Scam
असा गौप्यस्फोट करत काँग्रेसचे सरचिटणीस संजय बालगुडे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून भाजप पदाधिकारी व महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी’ अशी मागणी महापालिका आयुक्त व राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.
Human Rights Day: जीवनाचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार! मानवाधिकार दिनानिमित्त जाणून घ्या तुमच्या
संजय बालगुडे यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भातील सीसीटीव्ही चित्रीकरण सादर करत माहिती दिली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख गजानन थरकुडे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी, ऍड. असीम सरोदे उपस्थित होते. बालगुडे म्हणाले, महापालिका निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार याद्या जाहीर झाल्या.
या प्रकरणाची तक्रार आली आहे. या संदर्भात उपयुक्त निखिल मोरे यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात तात्काळ अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यानंतर संधितांवर कारवाई केली जाईल.
– प्रसाद काटकर, उपयुक्त निवडणूक, पीएमसी.
मात्र त्यापूर्वीच भाजप पदाधिकारी व महापालिकेच्या भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यानी एकत्र बसून वेगवेगळ्या मतदार याद्या फोडत होते.
या प्रभागामधील मतदार दुसऱ्या प्रभागामध्ये टाकत मतदार यादीत फेरफार केला जात होता. हा सर्व प्रकार साडे चार तास सुरू होता.
Maharashtra Winter Session : नाना पटोलेंच्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर; म्हणाले
मतदार याद्यांमध्ये फेरफार करणे हे पूर्वनियोजित षडयंत्र आहे. मतदारयाद्या प्रसिद्ध होण्यापूर्वीच त्या फोडायच्या, त्यामध्ये बदल करायचे व मतदारांना दुसऱ्या प्रभागामध्ये टाकायचे.
हा तर मतदान चोरीचा अभिनव प्रकार आहे. आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकारची दखल घेऊन स्वतः निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करावी अशी मागणी ऍड. सरोदे यांनी केली.