मुंबई: राज्याच्या पोलिस महासंचालकपदावरून रश्मी शुक्ला यांना तातडीने हटविण्यात यावे, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे काँग्रेसकडून पदावरून हटवण्यासाठी आग्रही मागणी करण्यात येत आहे. काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील निवडणू क आयोहगाला दोन दिवसांपूर्वी पत्र लिहून रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवण्याची मागणी केली होती. मागणी केली होती.
राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहे. ते राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांच्या शिष्टमंडळाशी चर्चाही केली. रश्मी शुक्ला आगामी विधानसभा निवडणुकीदरम्यान या राज्याच्या पोलिस महासंचालकपदावर राहिल्यास त्या आपल्या पदाचा गैरवापर करू शकतात, त्यामुळे त्यांची तातडीने बदली करण्यात यावी, अशी तक्रार करत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा:“मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय न झाल्यास…”; FRP च्या मागणीसाठी राजू शेट्टींची आक्रमक भूमिका
त्याचबरोबर, गेल्या काही काळापासून एकाच पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचीही बदली करण्यात यावी,असेही काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे. दरम्यान,2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात आली. महविकास आघाडी सरकार अस्तित्त्वात येत असताना रश्मी शुक्ला यांनी राज्यातील काही मह्त्त्वाचे नेते, पत्रकार, समाजसेवकांचे फोन टॅपिंग केले, असा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांनी केला होता.
यात खासदार संजय राऊत, नाना पटोले, जितेंद्र आव्हाज यांच्यासह राज्यातील इतर काही नेत्यांचेही फोन टॅप करण्यात आले. असा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांनी केला होता. यात रश्मी शुक्ला यांचे नाव आघाडीवर होते. महाविरकास आघाडी सरकारच्या काळात त्या सुट्टीवर होत्या. पण राज्यात सत्तांतर झाल्यानंतर त्यांना फोन टॅपिंग प्रकरणात क्लीनचीटही देण्यात आली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रश्मी शुक्ला यांना पुन्हा एकदा पोलीस महासंचालक पद दिले.
हेही वाचा: ‘काळा घोडा आर्ट्स फेस्टिव्हल’ होणार लवकरच सुरु, निधी संकलनात राहुल देशपांडेची रंगणार