‘काळा घोडा आर्ट्स फेस्टिव्हल' होणार लवकरच सुरु, निधी संकलनात राहुल देशपांडेची रंगणार मैफिल (फोटो सौजन्य-Social Media)
काळा घोडा असोसिएशन आणि काळा घोडा आर्ट्स फेस्टिव्हल यंदा २५ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ दरम्यान दक्षिण मुंबईत साजरा होत असून त्यासाठी निधी संकलन व्हावे म्हणून ‘काळा घोडा असोसिएशन’ आणि ‘काळा घोडा आर्ट्स फेस्टिव्हल’ यांच्या माध्यमातून प्रख्यात शास्त्रीय संगीत गायक राहुल देशपांडे यांच्या शास्त्रीय संगीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रविवारी २९ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता जमशेद भाभा थिएटर ‘एनसीपीए’ येथे ‘राहुल देशपांडे कलेक्टिव्ह कॉन्सर्ट’ सादर होणार आहे. ‘काळा घोडा आर्ट्स फेस्टिव्हल’ची प्रस्तुती जेएसडब्ल्यू ग्रुपची असून लाईफ कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा पाठिंबा मिळाला आहे. तसेच, हा सोहळा छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय आणि नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स यांच्या सहकार्याने साजरी होत आहे.
ही विशेष अशी संगीत मैफिल हाउसफुल्ल झाली असून हा कार्यक्रम काळा घोडा जिल्ह्याचा उंची वारसा अबाधीत राखण्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या महोत्सवाचा संगीताचा भाग होत हा सोहळा अतुलनीय ठरणार आहे.प्रतिष्ठित अशा दक्षिण मुंबई परिसराचा सांस्कृतिक वारसा जपणे आणि संवर्धनाच्या कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आलेल्या विविध संवर्धन प्रकल्पामध्ये ही संगीत मैफिल एक महत्वाचा भाग ठरणार आहे.
या संगीत मैफिली बद्दल बोलताना ‘काळा घोडा असोसिएशन’च्या संचालिका ब्रिंदा मिल्लर म्हणाल्या, “यंदा आम्ही काळा घोडा फेस्टिवलचे २५वे वर्ष साजरे करत आहोत या महोत्सवाचे आयोजन पुन्हा एकदा करताना आणि दक्षिण मुंबईतील कला आणि समाजजीवन यांचा एक आगळा प्रवास पुढे चालू ठेवत असल्याचा आम्हाला अतिशय आनंद होता आहे. राहुल देशपांडे कलेक्टीव्हच्या माध्यमातून अनोख्या, ऐतिहासिक, कलात्मक अशा काळा घोडा संस्कृतीसाठी निधी संकलन करणे आणि पाठबळ मिळवणे हा उद्देश त्यामागे आहे. त्या माध्यमातून आमच्या वास्तूंचे संवर्धन करणे आणि आमच्या सांस्कृतिक वारशाचे बळकटीकरण करणे आणि हे करत असताना आमचे सहकारी, आश्रयदाते आणि रसिकांचा सहभाग मिळविणे हे आमचे उद्दिष्ट आहे.” असे त्यांनी सांगितले.
राहुल देशपांडे हे भारतीय शास्त्रीय संगीतातील एक नावाजलेले कलाकार आहेत. ते मूळचे पुण्याचे आहेत. शास्त्रीय संगीत क्षेत्रातील त्यांचे योगदान अतुलनीय असे आहे. पटियाला घराण्याचे प्रख्यात शास्त्रीय संगीतकार डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचे ते नातू असून राहुल देशपांडे या मैफिलीत अविस्मरणीय रंत्ग भरतील यात काही शंका नाही. भारतीय शास्त्रीय संगीतातील कर्णमधुर असे संगीतसूर या मैफिली सादर होणार आहेत. या बैठकीचे आयोजन द इव्हेंट कंपनी आणिस जिंजर पीआर यांच्या माध्यमातून होणार आहे.\
हे देखील वाचा- प्रिया बापट ‘बिग बॉस मराठी’मध्ये गेली तर ? अभिनेत्रीने स्वत: दिली प्रतिक्रिया
‘काळा घोडा आर्ट्स फेस्टिव्हल’ आशिया खंडातील सर्वात मोठा अबुआयामी असा पथजक महोत्सव असून त्याचे २५ वे सत्र साजरे होत आहे. या २५ वर्षांमध्ये या महोत्सवाने सर्वोत्तमता, सांस्कृतिक उत्सव आणि समाजाचा सहभाग या गोष्टी साध्य केल्या आहेत. २५ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत हा महोत्सव साजरा होत असून त्यात सर्जनशीलता, नाविन्यपूर्णता, निरंतरता सर्वसमावेशकता यांचा अगळी-वेगळा अनुभूती रसिकांना पाहायला मिळणार आहे.