Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! महाविकास आघाडीत ‘या’ कारणामुळे पडली वादाची ठिणगी; ‘मातोश्री’वर होणार महत्त्वपूर्ण बैठक

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी शिवसेनेने आघाडी धर्म पाळला नाही, असा थेट आरोप केला आहे. या युतीवर शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आपले हात झटकले आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 15, 2026 | 09:09 AM
'मातोश्री'वर आज ठाकरे गटाच्या खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक; 'या' गोष्टीवर होणार चर्चा?

'मातोश्री'वर आज ठाकरे गटाच्या खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक; 'या' गोष्टीवर होणार चर्चा?

Follow Us
Follow Us:

चंद्रपूर : चंद्रपुरातील महानगरपालिकेत सत्ता स्थापनेचा विषय महापौरपदाच्या निवडणुकीच्या ४ दिवसानंतरही चर्चेत आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जायचे नाही असे ठरवले असताना चंद्रपूरमध्ये भाजप आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने युती केली आणि ‘उबाठा’ गट सत्तेत सहभागी झाला आहे. यावरून महाविकास आघाडीमध्ये सध्या चांगलीच खडाजंगी सुरू आहे.

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी शिवसेनेने आघाडी धर्म पाळला नाही, असा थेट आरोप केला आहे. या युतीवर शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आपले हात झटकले आहेत. हा पक्षाचा किंवा उद्धव ठाकरे यांचा निर्णय नाही. हा सर्व प्रकार स्थानिक नेत्यांनी केला असून त्यांच्यावर कारवाई निश्चित होईल, असे सांगत संजय राऊत यांनी आपण युतीचे समर्थन करत नसल्याचे जाहीर केल्याने हा विषय राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरला आहे. या सर्व चर्चांना विराम देण्यासाठी आता चंद्रपूर मनपातील सत्तारूढ शिवसेना ठाकरे गट व शिवसेना पदाधिकारी सोमवारी मुंबई येथे मातोश्रीवर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

हेदेखील वाचा : Maharashtra Politics : कॅबिनेटमंत्र्याचे कार्यालय सील होण्याची पहिलीच घटना! नरहरी झिरवाळ ‘नॉटरिचेबल’ झाल्याने संशय वाढला

दरम्यान, तुमचेच नेते आपसात भांडत होते. प्रदेशाध्यक्षांनी दिलेला फॉर्म्युलादेखील काँग्रेस नेते मान्य करायला तयार नव्हते. हा वाद दिल्लीपर्यंत पोहोचला होता. सत्ता स्थापन करण्यासाठी लागणारे नगरसेवकांचे संख्याबळ गोळा करण्याची जबाबदारी काँग्रेसचीच होती. मात्र, शेवटपर्यंत काँग्रेसमध्ये एकमत नव्हते, असे सांगून त्यांनी या स्थितीसाठी काँग्रेसलाच जबाबदार धरले. तत्पूर्वी, चंद्रपूर महापालिकेत उद्धव ठाकरे सेनेने दगा दिल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ चांगलेच संतापले होते. याचे परिणाम उद्धव सेनेला भोगावे लागतील.

संजय राऊतांच्या काँग्रेसला कानपिचक्या

परभणीत ठाकरे सेनेला सत्ता स्थापन करण्याची गरज भासणार आहे. त्यावेळी आम्ही वचपा घेऊ, असा इशारा सपकाळांनी दिला होता. मात्र, प्रत्यक्षात परभणीत उपमहापौरपद घेऊन काँग्रेसने ठाकरे गटासोबत सत्तेत सहभागी झाली. आम्ही युती धर्म पाळला, असेही सपकाळांनी यावेळी जाहीर केले.

वरुण सरदेसाई नगरसेवकांच्या संपर्कात

दरम्यान, चंद्रपूरमधील ठाकरे सेनेच्या नगरसेवकांसोबत पक्षातील एक वेगळाच नेता वाटाघाटी करत होता. आ. वरुण सरदेसाई हे नगरसेवकांच्या संपर्कात होते, असे आता समोर आले आहे. त्यावरून संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली असून, हा सर्व प्रकार उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातल्याचे सांगितले जाते.

Web Title: There is a dispute in the mahavikas aghadi in chandrapur due to one reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 09:09 AM

Topics:  

  • Mahavikas Aghadi
  • political news

संबंधित बातम्या

‘शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा केलाच पाहिजे’; भाजप सरकारवर हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघात, कर्जमाफीसाठी एल्गार तीव्र
1

‘शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा केलाच पाहिजे’; भाजप सरकारवर हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघात, कर्जमाफीसाठी एल्गार तीव्र

खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे आक्रमक; आता बंडखोर खासदारांच्या थेट मतदारसंघात जाऊन…
2

खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे आक्रमक; आता बंडखोर खासदारांच्या थेट मतदारसंघात जाऊन…

Mahavikas Aaghdi Politics: महाविकास आघाडीत नव्या भुकंपाची चाहूल; बैठकीला २३ आमदारांची गैरहजेरी
3

Mahavikas Aaghdi Politics: महाविकास आघाडीत नव्या भुकंपाची चाहूल; बैठकीला २३ आमदारांची गैरहजेरी

Aditya Thackeray: पत्रकारांना धमकावणाऱ्या संजय दिना पाटलांवर आदित्य ठाकरे कडाडले; म्हणाले, ‘हिंमत असेल तर राजीनामा द्या अन्…’
4

Aditya Thackeray: पत्रकारांना धमकावणाऱ्या संजय दिना पाटलांवर आदित्य ठाकरे कडाडले; म्हणाले, ‘हिंमत असेल तर राजीनामा द्या अन्…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.