रश्मी शुक्ला यांच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल; नेमकं काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर
ऐन विधानसभा निवडणुकीत रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवण्यात आलं होतं. मात्र त्यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. पुन्हा रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालक पदावर पुन्हा वर्णी लागू शकते. त्यामुळे काँग्रेसने आतापासूनच फिल्डिंग लावणं सुरू केल आहे. काँग्रेसने रश्मी शुक्ला यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सध्या रश्मी शुक्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे.
न्यायालयासंदर्भातील बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांनी तक्रार केल्यामुळे निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. त्यांच्या जागी संजय वर्मा यांना पोलीस महासंचालक म्हणून नियुक्त केलं आहे. परंतु शुक्ला यांचं सेवेत पुनरागमन होण्याची दाट शक्यता दिसताच काँग्रेसने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शुक्ला यांना पुन्हा सेवेत न घेता संजय वर्मा यांना पोलीस महासंचालक म्हणून कायम करावं असा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे.
रश्मी शुक्ला या निवृत्त आहेत. त्यामुळे त्यांना पदावरून हटवल्यानंतर सक्तीच्या रजेवर पाठवता येणार नाही. त्यांना निवृत्त घोषित करावं. राज्य सरकारने निवडणूक आयोगाच्या आदेशाचं तंतोतंत पालन करावं आणि त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी काँग्रेसने आपल्या याचिकेद्वारे केली आहे.
पोलीस प्रशासनासंदर्भातील बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
निवृत्तीनंतर रश्मी शुक्ला यांंना पोलीस महासंचालक पदावर मुदतवाढ देण्यात आली होती. पोलीस महासंचालक पदाची मुदतवाढ असल्यानं निवडणूक आयोगानं त्या पदावरुन काढल्यानंतर त्या निवृत्त होण्याची गरज होती. मात्र त्या ऐवजी सरकारने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून निवडणूक आयोगाच्या आदेशाची पायमल्ली केल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. निवडणूक आयोगाकडे दाद मागितली होती, मात्र आयोगाकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने काँग्रेसने मुंबई हायकोर्टात धाव घेतल्याची माहिती अतुल लोंढे यांनी दिली.
रश्मी शुक्ला यांच्या विरोधात काँग्रेसकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यांना पुन्हा सेवेत घेतलं जाऊ नये अशी मागणी करत मुंबई कॉंग्रेसनं हायकोर्टात धाव घेतली आहे. सध्या रश्मी शुक्ला यांना निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर राज्य सरकारकडून सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे.
रश्मी शुक्ला यांना निवडणूक आयोगानं पदावरून काढून टाकावं असं आदेशात म्हटलं असतानाही शुक्ला यांना केवळ सक्तीच्या रजेवर का पाठवण्यात आलं? असा सवाल याचिकेतून करण्यात आला आहे. पोलीस महासंचालक पदावर संजयकुमार वर्मा यांची नियमानुसार नेमणूक झाली असतानाही त्यांना तात्पुरतं पद का देण्यात आलं?, असंही विचारण्यात आलं आहे.
निवडणूक आयोगाच्या आदेशाची राज्य सरकारकडून पायमल्ली झालेली आहे. . त्यांची वयाची 60 वर्ष पूर्ण झाली होती. निवडणूक आयोगाने पोलीस महासंचालक पदावरुन त्यांना काढून टाकल्याची ऑर्डर दिली होती. मुदतवाढ देताना केंद्राच्या एका समितीची परवानगी घ्यायची असते ती पण घेतलेली नाही अशी आमची माहिती आहे.रश्मी शुक्लांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आणि संजयकुमार वर्मा यांची नियुक्ती करताना ती तात्पुरतं असल्याचं दाखवण्यात आलं आहे. मुदतवाढ डीजीपी पदासाठी होती, रश्मी शुक्ला या रिटायर झालेल्या आहेत, त्यांना पदावरुन काढलं तरं मुदतवाढ संपून त्या रिटायर होतात मग सक्तीच्या रजेवर का पाठवलं, असा सवाल अतुल लोंढे यांनी केला.