Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काँग्रेसकडून आरोपीचा ‘तो’ व्हिडिओ शेअर; न्यायिक चौकशीची मागणी करत विचारले 5 गंभीर प्रश्न

पुणे कल्याणीनगर अपघाताच्या प्रकरणामध्ये अल्पवयीन आरोपी मुलाचा पुण्यातील प्रसिद्ध पबमध्ये दारू पितानाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. कॉंग्रेसने हा व्हिडिओ शेअर करत न्यायिक चौकशीची मागणी केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: May 21, 2024 | 04:54 PM
काँग्रेसकडून आरोपीचा ‘तो’ व्हिडिओ शेअर; न्यायिक चौकशीची मागणी करत विचारले 5 गंभीर प्रश्न
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या भीषण अपघाताच्या घटनेमुळे राज्यामध्ये रोष व्यक्त केला जात आहे. अल्पवयीन मुलाने केलेल्या अपघातानंतर त्याला देण्यात आलेल्या शिक्षेवर सर्व स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. या घटनेमध्ये दोन जणांचा हाकनाक जीव गेला असून या प्रकरणाची कसून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यानंतर आता अल्पवयीन आरोपी मुलाचा पुण्यातील प्रसिद्ध पबमध्ये दारू पितानाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. कॉंग्रेसने हा व्हिडिओ शेअर करत न्यायिक चौकशीची मागणी केली आहे.

कॉंग्रेसचे नेते व विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या ऑफिशियल अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याचसोबत काही प्रश्न देखील उपस्थित केले आहेत. आरोपीने या अपघातापूर्वी एका बारमध्ये मद्यप्राशन केलं होतं याचा व्हिडीओदेखील समाजमाध्यमांवर शेअर केला आहे. वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. वडेट्टीवार यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे की, “पुणे अपघातातील आरोपीची अल्कोहोल चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. अल्पवयीन असलेला आरोपी दारूत पित असल्याचे CCTV फुटेज असून ही हा अहवाल आल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह आहे त्यामुळे या प्रकरणी न्यायिक चौकशी व्हावी,” अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.

विजय वडेट्टीवार यांचे ट्वीट

दोन निष्पाप लोकांचा जीव घेणाऱ्या पुणे अपघाताची न्यायिक चौकशी व्हावी पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह, त्यामुळे या प्रकरणी न्यायिक चौकशी व्हावी पुणे अपघातातील आरोपीची अल्कोहोल चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. अल्पवयीन असलेला आरोपी दारूत पित असल्याचे CCTV… pic.twitter.com/EKsypQCfWA — Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) May 21, 2024

विजय वडेट्टीवार यांनी व्हिडिओ शेअर करत काही प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केली आहेत. अल्पवयीन आरोपीला दारू कशी उपलब्ध झाली? रजिस्ट्रेशन नसलेली गाडी पुण्यातील रस्त्यावर कशी आली? नियम डावलून बार आणि पब सुरू होते का? होते तर त्यांच्यावर कारवाई का नाही? या प्रश्नांचा तपास न करता आरोपीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी जणू पुणे पोलिसांचा तपास असल्याचे चित्र आहे.  आरोपी अल्पवयीन आहे हे माहीत असताना त्याच्या वडिलांना अटक करण्यात इतका वेळ का लागला?  म्हणूनच सदर घटनेची न्यायिक चौकशी व्हावी आणि या प्रकरणात पुणे पोलिसांची सुद्धा चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे. असे मत कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Congress leader vijay wadettiwar post video of accused minor boy in pune kalyaninagar porsche accident case nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2024 | 04:53 PM

Topics:  

  • Congress Political News
  • Pune Accident
  • Pune Accident Case
  • Vijay wadettiwar

संबंधित बातम्या

काँग्रेस नेते वडेट्टीवारांचे खुद्द भाजप प्रदेशाध्यक्षांनीच केलं कौतुक; राजकीय चर्चांना उधाण
1

काँग्रेस नेते वडेट्टीवारांचे खुद्द भाजप प्रदेशाध्यक्षांनीच केलं कौतुक; राजकीय चर्चांना उधाण

Pune Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर रीलस्टार प्रतीक शिंदेचा अपघात, भरधाव फॉर्च्युनरची क्रेटाला धडक; तीन गाड्यांचे नुकसान
2

Pune Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर रीलस्टार प्रतीक शिंदेचा अपघात, भरधाव फॉर्च्युनरची क्रेटाला धडक; तीन गाड्यांचे नुकसान

भाजपकडून अपेक्षा ठेवणे चुकीचे, ओबीसींनाच ओपनमध्ये येण्याचे आवाहन करणार; विजय वडेट्टीवार यांचं विधान
3

भाजपकडून अपेक्षा ठेवणे चुकीचे, ओबीसींनाच ओपनमध्ये येण्याचे आवाहन करणार; विजय वडेट्टीवार यांचं विधान

भाजपने मतचोरी करून महाराष्ट्रात 132 आमदार निवडून आणले, मतचोरांना आता…; विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल
4

भाजपने मतचोरी करून महाराष्ट्रात 132 आमदार निवडून आणले, मतचोरांना आता…; विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.